हॉटेलच्या नावाखालील अश्लील चाळे थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:36 IST2021-03-28T04:36:58+5:302021-03-28T04:36:58+5:30
सातारा : शहरात कॅफे (हॉटेल) च्या नावाखाली अश्लील चाळे सुरू आहेत. ते त्वरित थांंबविण्यात यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेेडण्यात ...

हॉटेलच्या नावाखालील अश्लील चाळे थांबवा
सातारा : शहरात कॅफे (हॉटेल) च्या नावाखाली अश्लील चाळे सुरू आहेत. ते त्वरित थांंबविण्यात यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेेडण्यात यईल, असा इशारा सातारा शहर शिवसेनेच्या वतीने पोलीस अधीक्षकांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सातारासारख्या ऐतिहासिक व सांस्कृतिक नावलौकिक असणाऱ्या शहरामध्ये कॅफे (हॉटेल) च्या नावाखाली अंतर्गत कंपार्टमेंट तयार करून शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ते इतरांपर्यंत सर्वांना वेळनिहाय रक्कम आकारून अनैतिक चाळे करण्यासाठी खुलेआम परवानगी दिली जात आहे.
गेले कित्येक दिवस हा व्यवसाय फोफावत चालला असून, शाळकरी मुले-मुली त्याची शिकार होत आहेत. तरी हा प्रकार त्वरित थांबविण्यात येऊन दोषींवर कडक कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा शिवसेेनेकडून तीव्र आंदोलन उभे करण्यात येईल. यातून काही नुकसान झाल्यास त्यास संपूर्णपणे प्रशासन जबाबदार असेल, असे पोलीस अधीक्षक यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. या वेळी शिवसेना शहरप्रमुख नीलेश मोरे, शाखाप्रमुख अमोल पवार, अभिजित सपकाळ, रवींद्र साळुंखे, सूरज जाधव आणि शिवसैनिक उपस्थित होते.
फोटो आहे..
27शिवसेना
सातारा शहरात कॅफेच्या नावाखाली सुरू असलेले चाळे त्वरित थांबविण्यासाठी शहर शिवसेनेच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.