ग्रामीण भागातील मुलांमध्ये संघर्षाची ऊर्मी : रूपनवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:37 IST2021-04-06T04:37:54+5:302021-04-06T04:37:54+5:30
वाई : ‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लहानपणापासून कष्ट करण्याची सवय असते. यामुळे त्यांची शारीरिक क्षमता ही चांगली असते. त्यांच्याअंगी असणाऱ्या ...

ग्रामीण भागातील मुलांमध्ये संघर्षाची ऊर्मी : रूपनवर
वाई : ‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लहानपणापासून कष्ट करण्याची सवय असते. यामुळे त्यांची शारीरिक क्षमता ही चांगली असते. त्यांच्याअंगी असणाऱ्या कलागुणांना वाव मिळाल्यास ती यशाचे शिखर गाठत असतात. कारण त्यांच्यामध्ये संघर्षाची ऊर्मी असते,’ असे मत मुख्याध्यापक अशोक रूपनवर यांनी व्यक्त केले.
श्री नरसिंह हायस्कूलमध्ये नवोदित अभिनेत्री छाया मालुसरे व कल्याणी मालुसरे यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांच्याहस्ते छाया मालुसरे व कल्याणी मालुसरे यांचा सन्मान करण्यात आला. या दोन्ही अभिनेत्री मालिकेत, चित्रपटांमध्ये अभिनय करीत आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव देसाई यांनी केले. कृष्णा कांबळे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला शिक्षक दत्ता देसाई, पूनम पोळ, शिवाजी सुरवसे, वैभव जाधव, नाना चिंचकर, उत्तम झाजुर्णे, वाई तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघटना उपाध्यक्ष दत्तात्रय महांगडे व सूर्यकांत पोळ, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.