शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

Satara: हाॅटेलमध्ये एसी रूममध्ये राहिला अन् बिल न देता पळाला; जकातवाडीतील एकावर गुन्हा 

By नितीन काळेल | Updated: May 23, 2024 18:47 IST

सातारा : हाॅटेलमध्ये राहून बिलाची रक्कम आॅनलाईन पाठविल्याचे भासवून ३२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना सांबरवाडी येथील ...

सातारा : हाॅटेलमध्ये राहून बिलाची रक्कम आॅनलाईन पाठविल्याचे भासवून ३२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना सांबरवाडी येथील एका हाॅटेलात घडली. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात जकातवाडीच्या एकावर गुन्हा नोंद झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी चंद्रसेन धनंजय जाधव (रा. पोवईनाका सातारा) यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार पंकज गणपत बाबर (रा. जकातवाडी, ता. सातारा) याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. दि. १४ ते १८ फेब्रुवारीदरम्यान ही घटना घडली आहे.संशियत पंकज बाबर याने सांबरवाडी, ता. सातारा येथील एका हाॅटेलमधील एसी खोली बुक केली होती. त्यावेळी त्याने खोली, जेवण आणि मद्याच्या बिलासाठी ३५ हजार रुपयांची आगाऊ रक्कम हाॅटेलच्या खात्यावर आॅनलाईन पाठविल्याचे सांगितले. तसेच पैसे गेल्याचा मेसेजही दाखविण्यात आला. त्यामुळे यावर विश्वास ठेवून त्याला हाॅटेलात खोली दिली. तसेच राहिलेल्या कालावधीत आॅर्डरप्रमाणे जेवण आणि मद्य पुरविण्यात आले.मात्र, दि. १८ फेब्रुवारीला पहाटे तो कोणासह न सांगता आणि सुमारे ३२ हजार रुपयांचे बील न देता निघून गेला. तसेच आॅनलाईनचे पैसे हाॅटेलच्या खात्यावरही जमा झाले नाहीत. त्यामुळे फसवणूक झाल्याचे समोर आले. सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. हवालदार चव्हाण हे तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस