राज्यस्तरीय बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धेचा समारोप

By Admin | Updated: July 10, 2015 00:35 IST2015-07-09T21:27:22+5:302015-07-10T00:35:15+5:30

पारितोषिक वितरण : पृथ्वीराज चव्हाण, राजेंद्र मुळूक यांची उपस्थिती

State-level Badminton Selection Test Competition concludes | राज्यस्तरीय बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धेचा समारोप

राज्यस्तरीय बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धेचा समारोप

कऱ्हाड : प्रेमलाकाकी चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्रीमती प्रेमलाताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने येथील शिवाजी स्टेडियमवर राज्यस्तरीय बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धेचा बुधवारी समारोप झाला. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. सातारा जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव भोसले, आमदार आनंदराव पाटील, नगराध्यक्षा अ‍ॅड. विद्याराणी साळुंखे, मलकापूर उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राहुल चव्हाण, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, नगरसेवक श्रीकांत मुळे, जावेद शेख, आदी उपस्थित होते. १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या एकेरी स्पर्धेत साई रेड्डी विजेता तर दिप रंभिया उपविजेता ठरला. तर याच वयोगटातील मुलींमध्ये वैदेही चौधरी विजेती तर स्मिथ तोषीवाल उपविजेती ठरली. मुलींच्या दुहेरी स्पर्धेत ऋतिका ठक्कर व सिमरन सिंग विजेती व अदिती कुठे, राधिका दाघोनकर उपविजेता ठरली. १९ वर्षे मुलांच्या मिश्र दुहेरी स्पर्धेत अमन संजय, रिया आरोलकर ही जोडी विजेती ठरली तर साई रेड्डी, अक्षय वारंग ही जोडी उपविजेती ठरली. १९ वर्षे मुलांच्या दुहेरी स्पर्धेत निहार केळकर, पारूश कुलकर्णी ही जोडी विजेती तर दिप रंभिया व प्रसन्नजित शिरोडकर ही जोडी उपविजेती ठरली. १९ वर्षे मुलींच्या एकेरी स्पर्धेत मृण्मयी संज्योती ही विजेती तर वैदेही चौधरी ही उपविजेती ठरली, १९ वर्षे मुलांच्या एकेरी स्पर्धेत आर्या भिवपत्की हा विजेता तर विनित कांबळे हा उपविजेता ठरला. १९ वर्षे मुलींच्या दुहेरी स्पर्धेत रितीका ठक्कर, सिमरन सिंग ही जोडी विजेती तर अक्षया वारंग, करीना मदन ही उपविजेती जोडी ठरली. १७ वर्षे मुलांच्या दुहेरी स्पर्धेत निखील वाडेकर, साई रेड्डी ही जोडी विजेती
व दिप रंभिया, सौरभ केराळकर यांनी उपविजेते पद पटकावले.चंद्रपूर, कोल्हापूर, पुणे, मुंबई, धुळे, नागपूर, सातारा, सांगली आदी ठिकाणाहून स्पर्धक सहभागी झाले होते. पाच दिवस पार पडलेल्या राज्यस्तरीय बॅटमिंटन स्पर्धेत या स्पर्धेत ४५० स्पर्धकांनी नावनोंदणी केली होती. (प्रतिनिधी)

Web Title: State-level Badminton Selection Test Competition concludes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.