सातारा जिल्ह्यातील आरोग्यविषयक रखडलेली कामे मार्गी लावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:36 IST2021-03-07T04:36:12+5:302021-03-07T04:36:12+5:30
सातारा : जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये, सिव्हील हॉस्पिटल, तसेच शासकीय महाविद्यालयांची प्रशासकीय रखडलेली कामे गतीने मार्गी लावणार असल्याचा विश्वास ...

सातारा जिल्ह्यातील आरोग्यविषयक रखडलेली कामे मार्गी लावणार
सातारा : जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये, सिव्हील हॉस्पिटल, तसेच शासकीय महाविद्यालयांची प्रशासकीय रखडलेली कामे गतीने मार्गी लावणार असल्याचा विश्वास आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजोग कदम यांनी व्यक्त केला.
येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, नगराध्यक्षा माधवी कदम, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामचंद्र जाधव, डॉ. सुधीर बक्षी, आदी उपस्थित होते.
डॉ. कदम पुढे म्हणाले, राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे पुणे आरोग्य विभाग उपसंचालक म्हणून माझ्यावर आरोग्याची जबाबदारी महत्त्वाची राहणार आहे. यासाठी दैनंदिन या तिन्ही जिल्ह्यांतील सिव्हिल सर्जन व डीएचओ यांच्याशी संपर्कात असणार आहे. या माहितीच्या आधारेच हा अहवाल राज्यस्तरावर दिल्यानंतर वरिष्ठ अधिकारी, तसेच मंत्रिस्तरावर निर्णय घेणे सुलभ होणार आहे.
सातारा जिल्ह्याचा आरोग्याचा वेळोवेळी आढावाही घेतला जाणार आहे. यामध्ये आता कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात वाढत असल्याने त्यासाठी जागा उपलब्ध कुठे, काय असतील याची दैनंदिन माहितीचे संकलन, याशिवाय रुग्ण वाढले तर काय करावे म्हणजे शासनाच्या गाईडलाईननुसार निर्णय घेणार आहे, तर सातारा मेडिकल कॉलेजच्या जागेची मोजणी कृष्णानगर येथे ३० सप्टेंबर २०१८ मध्ये केली.
सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी कृष्णानगर येथे ६१ एकर जागा या महाविद्यालयासाठी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे शासनस्तरावर याचे काम सुरू आहे. ते लवकरच पूर्ण करण्यास प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.