सज्जनगडाजवळ एसटीचा ब्रेक निकामी, आठ प्रवासी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2018 17:30 IST2018-03-04T17:30:54+5:302018-03-04T17:30:54+5:30
सज्जनगड मार्गावरील बोरणे घाटात रविवारी दुपारी जांभे-सातारा या एसटीचा ब्रेक निकामी झाला. यामुळे चालकाचा ताबा सुटल्याने गाडी रस्त्याकडेच्या कठड्याला धडकली.

सज्जनगडाजवळ एसटीचा ब्रेक निकामी, आठ प्रवासी जखमी
सातारा : सातारा-सज्जनगड मार्गावरील बोरणे घाटात रविवारी दुपारी जांभे-सातारा या एसटीचा ब्रेक निकामी झाला. यामुळे चालकाचा ताबा सुटल्याने गाडी रस्त्याकडेच्या कठड्याला धडकली. यामध्ये आठ प्रवासी जखमी झाले. याबाबत माहिती अशी की, राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा आगाराची जांभे-सातारा एसटी (एमएच ७ सी ९०३३) ही रविवारी दुपारी जांभेहून साता-याला येत होती. एसटी बोरणे घाटात आली असता ब्रेक निकामी झाला. यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. चालक नितीन घाटे यांनी प्रसंगावधान राखून गाडी रस्त्याकडेच्या कठड्याला धडकवली.
या अपघातात गाडीतील आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले. यामध्ये तीन महिन्यांच्या मुलासह पाच बालके आणि चार महिलांचा समावेश आहे. जखमींना रुग्णवाहिकेतून सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.