कऱ्हाड-पाटण रस्त्याचे चौपदरीकरण गतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:32 IST2021-01-15T04:32:35+5:302021-01-15T04:32:35+5:30

कऱ्हाड : कऱ्हाड ते पाटण रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. ठिकठिकाणी जोडरस्त्याचे काम सुरू करण्यात आले ...

At the speed of four-laning of Karhad-Patan road | कऱ्हाड-पाटण रस्त्याचे चौपदरीकरण गतीने

कऱ्हाड-पाटण रस्त्याचे चौपदरीकरण गतीने

कऱ्हाड : कऱ्हाड ते पाटण रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. ठिकठिकाणी जोडरस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे, तर काही ठिकाणी दुभाजक उभारले जात आहेत. कऱ्हाडनजीकच्या वारुंजी फाट्यापासून सुपने गावापर्यंत रस्त्यावर साईडपट्ट्यांना पांढरे पट्टेही मारण्यात आले आहेत. काही ठिकाणी एका लेनचे काम अद्याप बाकी आहे. ते कामही येत्या काही दिवसांत पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. पाटण परिसरात हे काम रखडले आहे. त्यासाठी संबंधित ठेकेदाराला तातडीने सूचना करण्याची मागणी होत आहे.

फलक नसल्याचे चालकांची फसगत

कऱ्हाड : वाठार, रेठरे बुद्रुक ते शेणोली स्टेशन या रस्त्यावर दिशादर्शक फलक नसल्याने प्रवाशांची तसेच वाहनधारकांची गैरसोय होत आहे. वाठार ते रेठरे बुद्रुक जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. महामार्गावरून येणारी आणि कृष्णा कारखान्याकडे जाणारी वाहने याच मार्गावरून मार्गस्थ होतात. मात्र, या मार्गावर कोठेही दिशादर्शक फलक नाहीत. दिशादर्शक फलकांअभावी नवीन वाहन चालकांची फसगत होत आहे. येथील रस्ता चांगला आहे. मात्र, केवळ दिशादर्शक फलक नसल्यामुळे वाहनधारकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

कोळे ते आणे रस्त्यावर वाढले अतिक्रमण

कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील कोळे-आणे या मुख्य रस्त्यावर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. परिणामी वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने लहान-मोठे अपघात घडत आहेत. कोळे-आणे या रस्त्यादरम्यान वांग नदीवरील पुलाशेजारी तीव्र उतार आणि वळणाचा रस्ता आहे. याठिकाणी रस्त्यावरच ऊस वाहतूक करण्यासाठी मुरूमाचा भराव टाकला आहे. परिणामी रस्त्यावर भराव पडल्याने उंचवटा निर्माण होऊन वाहतुकीस अडथळा होत आहे. तसेच याठिकाणी वळण व तीव्र उतार असल्याने दुचाकी चालकांसह मोठ्या वाहनधारकांचा वाहनावरील ताबा सुटत आहे. अनेक लहान-मोठे अपघात घडल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तीव्र उतार आणि वळण असल्याने मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कृष्णा कॅनॉलवर दररोज वाहतूक अस्ताव्यस्त

कऱ्हाड : येथील कृष्णा कॅनॉल परिसरातून मसूर व विट्याच्या दिशेने वाहने जातात. मात्र, याठिकाणी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी व रस्ता पार करण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याने वाहतुकीचा बोजवारा उडत असल्याचे दिसून येत आहे. तिन्ही दिशांनी येणारी वाहने एकाच ठिकाणी समोरासमोर येतात. ही वाहने मार्गस्थ होताना काहीवेळा वादावादी घडते. कृष्णा कॅनॉलवर मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र, याठिकाणी सुरक्षात्मक उपाययोजना नाहीत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी याठिकाणी पोलीस कर्मचारी असतात. मात्र, ते कारवाई करण्यात व्यस्त असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

मोरणा विभागात वाढला बिबट्याचा वावर

पाटण : तालुक्यातील मोरणा विभागातील नोटोशी, कुसरूंड, वाडीकोतावडे आणि आंब्रग येथे वारंवार बिबट्याचे दर्शन होत असून, त्याच्या डरकाळीने शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी शेतशिवारात जाणे बंद केल्यामुळे शेती, दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन व्यवसाय अडचणीत सापडले आहेत़.

मोरणा विभागातील नोटोशी, कुसरूंड, वाडीकोतावडे आणि आंब्रग ही सर्व गावे डोंगराच्या पायथ्याशी वसली आहेत. गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे़. या गावातील सर्व पाळीव जनावरे चरण्यासाठी डोंगरावर नेली जातात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या विभागात बिबट्याच्या वावरामुळे शेती आणि पूरक व्यवसाय अडचणीत सापडले आहेत. हल्ल्याच्या भीतीमुळे ग्रामस्थांत भीतीचे वातारण निर्माण झाले आहे.

Web Title: At the speed of four-laning of Karhad-Patan road