शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक महिला दिन: सातारा जिल्ह्यातील १४९२ ग्रामपंचायतींत महिलांची विशेष सभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 15:24 IST

पाणी अन् स्वच्छतेसाठी झटणाऱ्या महिलेचा सन्मान

सातारा : जागतिक महिला दिन ८ मार्चला असतो. या महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील १ हजार ४९२ ग्रामपंचायती विशेष महिला सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये पाणी आणि स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या महिलांचा सन्मान होणार आहे. तसेच ग्रामपंचायतीमध्ये ‘विशेष स्वच्छता धाव’चेही आयोजन करण्यात आलेले आहे.जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या अनुषंगाने जिल्हास्तर, तालुका आणि गावस्तरावर हे कार्यक्रम होत आहेत. तर पाणी व स्वच्छता संबंधित उत्कृष्ट आणि आदर्श काम करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात येणार आहे.यामधून महिलांना प्रोत्साहित केले जाईल. त्यामुळे यातून इतर महिलांनाही प्रेरणा मिळणार आहे. तसेच तालुकास्तरावर ‘हर घर जल’ घोषित गावांना राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र आणि सन्मानपत्र देण्यात येणार आहे. यासाठीच जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतील सभा होणार आहे.यानिमित्ताने सर्व ग्रामपंचायतींमध्ये महिलांची ‘विशेष स्वच्छता धाव’ आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये महिला, किशोरवयीन मुली, विद्यार्थिनी, स्वच्छता कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य आणि प्रभावशाली लोकांचा समावेश करून पाणी, स्वच्छता व आरोग्य संबंधित संदेशाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींत महिलादिनी महिलांशी विशेष सभा होणार आहे. यामध्ये विविध विषयांवर चर्चा होईल. पाणी आणि स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या महिलांचाही सन्मान होणार आहे. तसेच ग्रामपंचायतीमध्ये ‘विशेष स्वच्छता धाव’चेही आयोजन करण्यात आलेले आहे. -प्रज्ञा माने-भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी व स्वच्छता विभाग 

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत पाणी, स्वच्छता आणि आरोग्य याविषयी प्रोत्साहन मिळण्यासाठी ‘महिलांची विशेष धाव’चे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच गावस्तरावर महिला सभेच्या माध्यमातून पाणी व स्वच्छता आरोग्यविषयी चर्चासत्रे आयोजित केलेली आहेत. पाणी व स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या महिलांचाही सन्मान जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून केला जाणार आहे. -याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWomen's Day Specialजागतिक महिला दिनgram panchayatग्राम पंचायत