कोपर्डे हवेली : भाताची पेरणी, टोकणीच्या तुलनेत भाताची रोपे लावून घेतलेले उत्पादन जास्त निघते. त्यामुळे भाताची रोपे तयार करण्यासाठी शेतकरी काळजी घेत असल्याचे चित्र शिवारात दिसत आहे. काही शेतकऱ्यांच्या भातावर रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे.
शेतकरी भाताचे उत्पादन घेण्यासाठी वेगवेगळ्या पध्दतीचा अवलंब केला जातो. त्यामध्ये सरी, पेरणी, कोकणी, भाताची रोपे आदींचा सामावेश आहे.
पंधरा ते वीस वर्षांपासून भाताची रोपे लावण्याची पद्धत कऱ्हाड तालुक्यात सुरू झाली. दरवर्षी भाताची रोपे लावून उत्पादन घेण्याचे क्षेत्र वाढत गेले.
भाताची रोपे लावण्यासाठी भात लागणीपूर्व रोपे तयार करावी लागतात. त्यासाठी हे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच रोहिणी नक्षत्रावर वाफे तयार करुन भाताचे बियाणे त्यामध्ये टाकतात. सुमारे पंचेचाळीस दिवसांपासून साठ दिवसांपर्यंत रोपे लावली जातात. पाऊस लांबला तर रोपे लावण्याचा कालावधी लांबतो. जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये रोपांची लावणी केली जाते. रोपे चांगली येण्यासाठी शेतकरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वेगवेगळ्या औषधांच्या फवारण्या घेऊन खतांचा वापर करतात.
वेगवेगळ्या जातीची बियाणे वापरली जातात. इंद्रायणी, बासमती भाताची लागवड तुलनेत शेतकरी जादा करतात.
भाताच्या लावणी पूर्व शेतकरी जमिनीची चिखलणी करून रोपांची लावणी करतात. त्यामुळे जमिनीची मशागत होऊन तणाचे प्रमाण कमी होते.
चौकट
भात हे जादा पाण्यावर अवलंबून असणारे पीक असल्याने बागायती विभागात मोठ्या क्षेत्रावर उत्पादन घेतले जाते. जेवढा जादा पाऊस तेवढे भातपिकास वातावरण अनूकल असते. त्यामुळेच पूर्णपणे पावसाळा सुरू झाल्याशिवाय भाताच्या रोपांची लावण केली जात नाही.
कोट...
भाताचे रोप जेवढे निरोगी आणि तजेलदार असेल, तेवढे उत्पादन चांगले निघण्यास मदत होते. त्यासाठी रोपांची काळजी घेतो.
- अक्षय चव्हाण,
शेतकरी कोपर्डे हवेली.
फोटो १५कोपर्डे हवेली
कोपर्डे हवेली परिसरातील शेतकरी भातरोपांची काळजी घेत आहेत. (छाया : शंकर पोळ)