शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

दारूसाठी पैसे न दिल्याने मुलाने केला वडिलांचा खून, साताऱ्यातील खळबळजनक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 16:22 IST

यात्रेच्या पूर्वसंध्येलाच खुनाची घटना घडल्याने यात्रेवर शोककळा पसरली

मलकापूर : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून वयोवृद्ध वडिलांच्या डोक्यात पहार घालून हत्या करण्यात आली. ही खळबळजनक घटना कऱ्हाड तालुक्यातील जखिणवाडी येथे शनिवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास घडली. रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशीच गावात यात्रा असते. यात्रेच्या पूर्वसंध्येलाच खुनाची घटना घडल्याने यात्रेवर शोककळा पसरली आहे.शिवाजी नारू नलवडे-पाटील (वय ६२), असे खून झालेल्या पित्याचे नाव आहे, तर अर्जुन शिवाजी पाटील (३७), असे संशयित मुलाचे नाव आहे.याबाबत पोलिस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कऱ्हाड तालुक्यातील जखिणवाडी येथे गावातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामागे शिवाजी नारू नलवडे-पाटील यांचे घर आहे. घरात शिवाजी पाटील यांच्यासह पत्नी रंगूबाई, मुलगा अर्जुन व मयत मुलीची दोन मुले असे कुटुंब वास्तव्यास आहे. मुलगा अर्जुन हा अविवाहित असून, तो अनेक दिवसांपासून व्यसनाधीन झालेला आहे. दारूसाठी पैसे मागण्यावरून कुटुंबात वारंवार कलह होत असे. शनिवारी रात्री अर्जुन पाटील याने दारूसाठी पैसे मागितले. वडिलांनी पैसे न दिल्याने चिडून जाऊन अर्जुनने वडील शिवाजी नारू नलवडे-पाटील यांच्या डोक्यात लोखंडी पहार घालून गंभीर जखमी केले. यावेळी झालेल्या आरडा-ओरड्यामुळे शिवाजी पाटील यांचे नातू जागे झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आजोबांना गावातील ग्रामस्थांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना थोड्या वेळातच त्यांचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच कऱ्हाड शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणी संशयित मुलगा अर्जुन पाटील यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशीच गावात मळाईदेवीचा रंगोत्सव असतो, तर दोन दिवस गावाची यात्रा असते. यात्रेच्या पूर्वसंध्येलाच झालेल्या या खुनामुळे जखिणवाडीत खळबळ उडाली आहे.आजीची जबाबदारी पडली नातवावर...जखिणवाडीत शिवाजी पाटील यांचा मुलानेच खून केला. त्यांचा दुसरा मुलगा कुटुंबासह कामानिमित्त मुंबईत आहे. घरातील अर्जुनच्या त्रासामुळे तो गावाकडे येण्याचे टाळत होता. त्यामुळे आता घरात केवळ आजी आणि एक २२ वर्षांचा व एक १४ वर्षांचा नातू राहिले आहेत. साठीच्या वर्षांच्या आजीचा सांभाळ करण्याची जबाबदारी आता त्याच्यावर आली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस