शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

Crime News Satara: पत्नीला आणायला गेला, सासरा अन् मेहुण्याने जावयाला हाणला; ..मग घडला हा प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 16:56 IST

पत्नीला आणण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे गेलेल्या युवकाला सासरा आणि मेहुण्याने मारहाण केली.

सातारा : पत्नीला आणण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे गेलेल्या युवकाला सासरा आणि मेहुण्याने मारहाण केली. मात्र, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी साताऱ्यातील पोलीस मुख्यालयासमोर युवकाने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. शनिवारी (दि.१४) घडलेली ही घटना आज, सोमवारी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी नवनाथ अशोक महापुरे (वय ३२, रा. मल्हार पेठ, सातारा) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नवनाथ महापुरे हा शनिवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास बाटलीतून पेट्रोल घेऊन पोलीस मुख्यालयासमोर आला. त्याने हातातील पेट्रोल अंगावर ओतले. हा प्रकार पोलीस मुख्यालयात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांच्या निर्दशनास आला. त्यानंतर पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता नवनाथ महापुरेला पकडले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. त्याच्याकडे पोलिसांनी या प्रकाराबद्दल चौकशी केली असता त्याने त्याच्याबाबत घडलेला प्रसंग पोलिसांना सांगितला.नवनाथची पत्नी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे काही दिवसांपूर्वी गेली आहे. तिला आणण्यासाठी तो श्रीगोंदा येथे गेला होता. त्यावेळी त्याचा मेहुणा महावीर गायकवाड व सासरे सर्जेराव गायकवाड यांनी त्याला मारहाण केली. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलीस नाईक राहुल खाडे यांनी रविवारी रात्री नवनाथ महापुरेच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस