तीन गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:25 IST2021-06-27T04:25:44+5:302021-06-27T04:25:44+5:30
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील पश्चिम भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या लढ्याला अनेक वर्षांनी यश आले आहे. पश्चिम भागातील अतिट, मिरजे, ...

तीन गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील पश्चिम भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या लढ्याला अनेक वर्षांनी यश आले आहे. पश्चिम भागातील अतिट, मिरजे, झगलवाडी या तीन गावांमधील महिलांची डोक्यावर हंडा घेऊन होणारी पायपीट थांबणार आहे. दुर्गम व पावसाचे प्रमाण जास्त आहे. तरीही पाण्यापासून वंचित राहत असलेली पश्चिम भागातील अतिट, मिरजे, झगलवाडी या गावांनी अनेक वर्षे पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष केला आहे.
मिरजे, अतिट, झगलवाडी येथील ग्रामस्थांनी पाणीपुरवठा योजना राबविण्याची शासनाकडे वारंवार मागणी करुनही तांत्रिक अडचणींमुळे मोठ्या प्रमाणात योजना राबविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या अनुषंगाने या तीन गावांचा मूलभूत प्रश्न विचारात घेऊन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी हा प्रश्न सोडविण्याचा चंग बांधत याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा सुरु केली.
आमदार मकरंद पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मिरजे, अतिट, झगलवाडी या तीन गावांचे सर्वेक्षण करून आराखडा तयार करुन पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी नियोजन केले. त्या अनुषंगाने शासनाच्या जलजीवन योजनेमध्ये समाविष्ट होण्याकरिता लागणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता करत या गावांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्याकडे प्रशासकीय मान्यतेकरिता पाठवले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी शिरवळ जिल्हा परिषद गटातील मिरजे, अतिट, झगलवाडी या गावांच्या पाणी पुरवठा योजनेच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी दिली.