आधार संस्थेने जपली सामाजिक बांधिलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:29 IST2021-01-10T04:29:47+5:302021-01-10T04:29:47+5:30
दिवंगत वेणूताई उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत दिनकरराव जगताप यांच्या स्मरणार्थ पाटण येथे आयोजित ...

आधार संस्थेने जपली सामाजिक बांधिलकी
दिवंगत वेणूताई उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत दिनकरराव जगताप यांच्या स्मरणार्थ पाटण येथे आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी डॉ. सी. के. यादव, डॉ. शहाजी शेळके, नितीन पिसाळ, जयसिंगराव जगताप, शिवाजीराव जगताप, यशवंतराव जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.
संस्थेचे अध्यक्ष अनिल मोहिते म्हणाले, रक्तदानासंबंधी अजूनही समाजामध्ये फारशी जागृती नाही. आपण दिलेल्या रक्तामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. कर्णानंतर दानशूर हा रक्तदाताच आहे. प्रत्येकालाच युद्धभूमीवर जाऊन देशासाठी रक्त सांडता येत नाही. शासकीय रक्तपेढीमध्ये रक्तदान केल्यामुळे गरीब, गरजूंना आपले रक्त उपयोगी पडते. देण्यातील आनंद हा वेगळाच असून हीसुध्दा एक प्रकारे देशसेवाच आहे.
शिबीर यशस्वीतेसाठी नंदकुमार शेडगे, सुरेश चव्हाण, शेखर धामणकर, योगेश चौधरी, विकास डोंगरे, कन्हैया घोणे, गणेश बीचकर, साद खतीब, प्रवीण पडवळ, लक्ष्मण पाटील, प्रसाद वळसंग, प्रमोद पाटेकर, सुरेश कळके, सोमनाथ आग्रे, स्वप्निल नेवरेकर आदींनी परिश्रम घेतले. शेखर धामणकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तर सुरेश चव्हाण यांनी आभार मानले.