सामाजिक कार्यकर्ते आमिरभाई शेख यांचा वाढदिवस उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:55 IST2021-01-02T04:55:20+5:302021-01-02T04:55:20+5:30
फलटण : फलटण शहरातील सामाजिक कार्यकर्ते आमिरभाई शेख यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रांतील ...

सामाजिक कार्यकर्ते आमिरभाई शेख यांचा वाढदिवस उत्साहात
फलटण : फलटण शहरातील सामाजिक कार्यकर्ते आमिरभाई शेख यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर व मित्रपरिवार यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या आवाहनानुसार आमिरभाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन लक्ष्मीनगर, बारवबाग येथे करण्यात आले होते. यावेळी या शिबिरात ४९ जणांनी रक्तदान केले. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये कोरोना चाचणीसह रक्ताच्या आवश्यक असणाऱ्या महत्त्वपूर्ण शुगर, हिमोग्लोबिन, कोलेस्ट्रॉल अशा विविध चाचण्या करण्यात आल्या. ढवळेवाडी येथे ‘अनमोल पार्क’चा प्रारंभ करण्यात आला.
वाढदिवसाच्या निमित्ताने आमिरभाई शेख यांना राष्ट्रीय काँग्रेसचे युवा नेते नगरसेवक सचिन सूर्यवंशी-बेडके, नगरपरिषदेचे गट नेते अशोकराव जाधव, महेंद्र सूर्यवंशी-बेडके, हिरालाल गांधी, मेहबूबभाई मेटकरी, प्रीतम जगदाळे, डॉ. योगेश गांधी, सिद्धार्थ दैठणकर, हर्षल लोंढे, ॠषिराज नाईक-निंबाळकर, युवराज पवार आदींसह राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रासह विविध क्षेत्रांतील मान्यवर विविध सेवाभावी, सामाजिक व गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. (वा.प्र.)
०१फलटण वाढदिवस
आमिरभाई शेख यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.