केमिकलमिश्रित पाण्याचा वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:37 IST2021-05-01T04:37:32+5:302021-05-01T04:37:32+5:30

कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्यालगतच्या आरसीसी गटाराला साफसफाई करण्यासाठी ठिकठिकाणी चेंबर तयार केले आहेत. त्या चेंबरवर झाकणं टाकली होती. दर्जाहीन झाकणामुळे येथील ...

The smell of chemically mixed water | केमिकलमिश्रित पाण्याचा वास

केमिकलमिश्रित पाण्याचा वास

कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्यालगतच्या आरसीसी गटाराला साफसफाई करण्यासाठी ठिकठिकाणी चेंबर तयार केले आहेत. त्या चेंबरवर झाकणं टाकली होती. दर्जाहीन झाकणामुळे येथील मोरया काॅम्प्लेक्स ते ढेबेवाडी फाटा परिसरात तीन ठिकाणी झाकण फुटून वर्ष उलटून गेले आहे. या ठिकाणचे झाकण फुटल्यामुळे नाल्यात दगड व मातीचा खच पडला आहे. त्यामुळेच या ठिकाणी नाला तुंबला आहे. शिवाय या उघड्या गटरमध्ये केमिकलमिश्रित पाणी साचल्याने घाण पाण्याचा उग्र वास येत आहे.

अनेक वर्षांपासून नालासफाई नाही

मलकापूर :

कराड-ढेबेवाडी रस्त्याच्या दुतर्फा बांधलेल्या आरसीसी नाल्यांची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. याचे सर्वाधिकार याच विभागाकडे आहेत. मात्र, नाले निर्मितीपासून एकदाही या नाल्यांची सापसफाई केलेली नाही. त्यामुळे या परिसरात अनेक ठिकाणी दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे, तर नाल्यात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

Web Title: The smell of chemically mixed water