शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्या हातांनी दिला मातीला आकार

By admin | Updated: July 27, 2014 00:20 IST

पर्यावरणपूरक गणेशोत्सव : मुलांनी घडविल्या गणेशमूर्ती; पालकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद

सातारा : बालगोपाळांमध्ये सध्या माय फ्रेंड गणेशाची भलतीच क्रेझ आहे. जणू काही गणपती बाप्पांशी मुलांची गट्टीच जमलीय. म्हणूनच की काय चिमुकल्या हातांनी मातीला आकार देत आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती बनविताना ही मुलं आनंदून गेली. कुणी आसनावर विराजमान गणेशमूर्ती बनविली तर कुणी खोडकर बालगणेश साकारला. कलेची देवता असणाऱ्या बाप्पांची नानाविध रूपं मुलांनी चित्रातून आणि मातीतून साकारण्याचा प्रयत्न केला.पर्यावरण रक्षणासाठी सातारकरांनी ‘लोकमत’च्या मोहिमेस दिलेला प्रतिसाद वाखाणण्याजोगा आहे. विचारांची पेरणी तर झाली आहे. आता त्याला कृतीची जोड देण्याची वेळ आली आहे. याच प्रेरणेतून वंडरबार किड्स प्री-प्रायमरी स्कूल आणि संस्कृती कला अकादमी यांनी लहान मुलांसाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती आणि रंगभरणाची कार्यशाळा आयोजित केली होती.या कार्यशाळेत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कशा तयार करायच्या याचे प्रात्यक्षिक संस्कृती कला अकादमीचे अध्यक्ष प्रसाद चव्हाणयांनी दाखविले. चिखलाच्या गोळ्यांना आकार देऊन कमी वेळेत सुंदर गणेशमूर्ती साकारलेली पाहून मुलं हरखून गेली. त्यानंतर मुलांनी आपल्या पालकांच्या मदतीने गणेशमूर्ती बनविण्याचा प्रयत्न केला. स्वत:च्या हातांनी आपल्या लाडक्या बाप्पांची मूर्ती तयार करताना मुलांचा आनंद ओसंडून वाहत होता. प्रत्येकाची मूर्ती वेगळी होती, कारण प्रत्येकाने आपल्या मनात असणाऱ्या श्री गणेशाची मूर्ती बनविण्याचा प्रयत्न केला होता. हुबेहूब गणेशमूर्ती बनविता आली नसली तरी चिमुकल्यांच्या भावना मात्र त्यात उतरल्या होत्या. यावेळी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कशा रंगवायच्या, कोणते रंग वापरायचे, या बाबींचे शास्त्रोक्त प्रशिक्षणही मुलांना देण्यात आले. तसेच चित्रांत रंग कसे भरायचे याचे सोपे प्रकारही मुलांना शिकविण्यात आले.या कार्यशाळेस कर्तव्य सोशल ग्रुपच्या अध्यक्षा वेदांतिकाराजे भोसले यांनी भेट दिली. चिमुकल्या हातांनी बनविलेल्या गणेशमूर्ती पाहून त्यांनी सर्वांचे कौतुक केले. स्कूलच्या शाखाप्रमुख सुनिता पवार, शिक्षक विशाखा निकम, स्वाती मोरे, अनुराधा मेनकुदळे, श्रीकांत पवार यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)बालकलेची भरले प्रदर्शनकार्यशाळेत मुलांनी बनविलेल्या सर्व गणेशमूर्तींचे आणि रंगभरण केलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले. आपणच आपल्या हातांनी बनविलेल्या मूर्ती न्याहाळताना मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद शतगुणित झाला होता. यावेळी विजय मांडके, चित्रकार सागर गायकवाड, प्रा. विजय माने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. पालकही बनले मूर्तिकार या कार्यशाळेत मुलांबरोबरच पालकांनीही सहभाग घेतला. मुलांवर चांगले संस्कार घडवून त्यांच्या आयुष्याला आकार देणारे पालक यावेळी मातीला आकार देऊन सुंदर गणेशमूर्ती साकारण्याची कला शिकले. तसेच यंदाच्या गणेशोत्सवात आपण स्वत: पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवून तिची घरात प्रतिष्ठापना करणार असल्याचेही पालकांनी बोलून दाखविले.