साताऱ्यातून सोळा वर्षाच्या युवतीचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:47 IST2021-07-07T04:47:26+5:302021-07-07T04:47:26+5:30
सातारा : येथील सदर बझार परिसरातून एका १६ वर्षीय युवतीचे अज्ञाताने अपहरण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात ...

साताऱ्यातून सोळा वर्षाच्या युवतीचे अपहरण
सातारा : येथील सदर बझार परिसरातून एका १६ वर्षीय युवतीचे अज्ञाताने अपहरण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याबाबतची तक्रार या युवतीच्या वडिलांनीच दिली आहे.
सातारा शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, पळवून नेलेल्या युवतीचे वडील मजुरी करतात. शनिवार, दि. ३ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही युवती घरी असताना तिला वडिलांनी जेवण करण्यास सांगितले असता, तिने ‘मला भूक नाही मी नंतर जेवते’, असे सांगून ती घराबाहेर बसली. यावेळी तिला अज्ञात व्यक्तीने पळवून नेले. याबाबतची तक्रार रविवार, दि. ४ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मुलीच्या वडिलांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे करत आहेत.