सोळशी वन पर्यटन केंद्राला बहर पे्रमाचा!

By Admin | Updated: April 24, 2016 23:43 IST2016-04-24T21:55:15+5:302016-04-24T23:43:07+5:30

प्रेमीयुगुलांचा राबता : शनिभक्त, पर्यटकांमधून गैरप्रकार थांबविण्याची मागणी

Sixteen forest tourism center excited! | सोळशी वन पर्यटन केंद्राला बहर पे्रमाचा!

सोळशी वन पर्यटन केंद्राला बहर पे्रमाचा!

वाठार स्टेशन : कोरेगाव, वाई, खंडाळा तालुक्याच्या सरहद्दीवर सोळशी, ता. कोरेगाव येथील हरेश्वर डोंगराच्या पायथ्याला आणि शनैश्वर देवस्थानच्या शेजारील डोंगर परिसरात महाराष्ट्र शासनाचे वन पर्यटन केंद्र सुरक्षा व्यवस्थेअभावी आता प्रेमीयुगुलांचा अड्डा बनले आहे.
वर्षभरापूर्वी कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील सोळशी येथील शनैश्वर मंदिर परिसरात ५० लाखाहून अधिक निधी खर्च करुन वनविभागाने वन पर्यटन केंद्राची उभारणी केली. मात्र, अलिकडच्या काळात या वन पर्यटन केंद्रात पर्यटकांपेक्षा प्रेमीयुगुलांचा वावर वाढत चालला आहे. दुपारच्या वेळेत तसेच सायंकाळी अनेक जोडपी या ठिकाणी झाडांच्या आडोशाला बसलेली असतात. यामुळे वनपर्यटकांची तसेच शनिभक्तांची मोठी निराशा होत आहे.
महाराष्ट्रातील लाखो शनिभक्तांची पंढरी असलेले शनैश्वर देवस्थान याच परिसरात असल्याने राज्यातून अनेक शनिभक्त दर्शनासाठी याठिकाणी कायमच ये-जा करत असतात. यावेळी हे शनिभक्त शेजारील वनपर्यटन केंद्रात फिरण्याचा आनंद घेतात. मात्र सध्या येथील वनराईत प्रेमीयुगुलाचे चाळे सुरू असल्यामुळे शनिभक्त याबाबत नाराजी व्यक्त करत आहेत.
वनविभागानेच आता यासाठी ठोस पावले उचलून येथील गैर प्रकारांना थांबविण्यासाठी वनसं़रक्षक नेमावा किंवा हे वनपर्यटन केंद्र शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी शनिभक्तांबरोबरच वनपर्यटकांतून होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Sixteen forest tourism center excited!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.