पोटात दुखल्याने सहा वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:24 IST2021-07-22T04:24:41+5:302021-07-22T04:24:41+5:30

सातारा : अचानक पोटात दुखत असल्याने सहा वर्षाच्या चिमुकल्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक ...

Six-year-old Chimukalya dies of abdominal pain | पोटात दुखल्याने सहा वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

पोटात दुखल्याने सहा वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

सातारा : अचानक पोटात दुखत असल्याने सहा वर्षाच्या चिमुकल्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना पाटण तालुक्यातील सांगवड येथे घडली आहे.

यश सागर घोडके (वय ६, रा. सांगवड, ता. पाटण) असे मृत्यू झालेल्या दुर्दैवी चिमुकल्याचे नाव आहे. याबाबत पाटण पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, यश घोडके याच्या पोटामध्ये अचानक दुखू लागले. त्यामुळे त्याला घरच्यांनी कऱ्हाड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. यशचा अचानक मृत्यू झाल्याने घोडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

प्राथमिकदृष्ट्या यशच्या पोटात दुखत असल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याची नोंद पाटण पोलीस ठाण्यात करण्यात आली असली तरी त्याच्या शरिरातील नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे समजणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Six-year-old Chimukalya dies of abdominal pain