शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू, 2 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 10:51 IST

पुणे-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देपुणे-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले.चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळल्याची माहिती मिळत आहे.

सातारा - पुणे-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले आहेत. चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळल्याची माहिती मिळत आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील काशीळ गावाजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर चालक आणि लहान मुलगी जखमी झाले आहेत. चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळल्याने अपघात झाला. कर्नाटक राज्यातील धारवाड येथील कुटुंबातील सदस्यांचा या अपघातात मृत्यू झाला.  मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला, एक लहान मुलगा आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. मुजावर हे प्रसिद्ध फुलांचे व्यापारी होते.

 

 

निजामुद्दीम मुजावर असे कुटूंब प्रमुखाचे नाव असून कोल्हापूर मार्गे ते मुंबईकडे निघाले असता चालकाला झोप आली. त्यामुळे रात्री 1.30 च्या सुमारास गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. झायलो गाडीतून हे कुटुंबीय कोल्हापूरहून मुंबईकडे आणि पुढे हज यात्रेस जाणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातग्रस्त गाडीचा क्रमांक KA 25 M ‌‌C 4359 असा आहे. जखमींना सिव्हिल हॉस्पिटल सातारा या ठिकाणी उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

 

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसरDeathमृत्यू