शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Satara: परतीच्या वाटेवर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा फलटणमध्ये मुक्काम!, आळंदीत कधी पोहचणार..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 13:43 IST

दर्शनासाठी भाविकांची गर्दी

फलटण : श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा परतीच्या मार्गावर रविवार, दि. १३ रोजी सायंकाळी नामदेव शिंपी समाज विठ्ठल मंदिर, रविवार पेठ, फलटण येथे मुक्कामी आला होता. नेहमी आषाढ वद्य चतुर्थीस फलटण परतीच्या मुक्कामी येणारा सोहळा यावर्षी एक दिवस अगोदर आषाढ वद्य तृतीयेस फलटण मुक्कामी आला होता. यावेळी शहरासह तालुक्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी केली होती.संत शिरोमणी ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळ्याने आषाढी वारीसाठी दि. १९ जून रोजी आळंदीहून प्रस्थान केले होते. पंढरपूर येथे आषाढी एकादशीनंतर परतीच्या वाटेवर सोहळा गुरुवार, दि. १० जुलै रोजी पंढरपूर येथून आळंदीकडे मार्गस्थ झाला, शुक्रवार, दि. ११ रोजी वेळापूर मुक्काम, शनिवार, दि. १२ रोजी नातेपुते मुक्काम झाला.रविवार, दि. १३ जुलै रोजी धर्मपुरी व साधूबुवा ओढा येथे सकाळचा विसावा, बरड, पिंप्रद, विडणी येथे दुपारचा विसावा आणि रात्री नामदेव शिंपी समाज विठ्ठल मंदिर, फलटण येथे मुक्कामी आली होती. सोमवार, दि. १४ जुलै रोजी सकाळी निंभोरे ओढा, सुरवडी, दत्त मंदिर, काळज येथे विसावा, तरडगाव येथे दुपारचा विसावा आणि लोणंद पूल फाटा येथून सोहळा रात्री पाडेगाव मुक्कामी थांबणार आहे.मंगळवार, दि. १५ रोजी वाल्हे, बुधवार, दि. १६ रोजी सासवड, गुरुवार, दि. १७ रोजी हडपसर, शुक्रवार, दि. १८ रोजी भवानी पेठ, पुणे, शनिवार, दि. १९ रोजी पुणे, रविवार, दि. २० रोजी आळंदी आणि सोमवार, दि. २१ रोजी सोहळा संत शिरोमणी ज्ञानेश्वर मंदिर येथे मुक्कामी पोहोचणार आहे.फलटणमधील भक्तांनी रात्री उशिरापर्यंत माउलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. शेजारील गावातून मोठ्या प्रमाणात महिला, तरुण व नागरिक दर्शनासाठी आले होते. एक दिवसाच्या मुक्कामानंतर पालखी पुढच्या मुक्कामी मार्गस्थ होणार आहे.

रस्त्याच्या दुतर्फा माउली भक्तांची गर्दी..वारीच्या परतीच्या मार्गावरील फलटणला तिसरा मुक्काम असतो. माळशिरस येथून पालखी नातेपुते मार्गे फलटणला पोहचली असून, पालखीसोबत नगारखाना व विणेकरी यांची गर्दी पाहायला मिळाली. पालखीचे स्वागत फलटण येथे क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे भाविकांनी प्रचंड गर्दीत केली होती. रस्त्याच्या दुतर्फा माउली भक्तांची गर्दी झाली होती. नाना पाटील चौक मार्गे पालखी छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे श्री विठ्ठल मंदिर येथे मुक्कामासाठी पोहोचली आहे.