साताऱ्यात दुकानदाराची आठ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 14:03 IST2020-02-18T14:02:41+5:302020-02-18T14:03:46+5:30
महागडे साहित्य खरेदी करून त्याचे पैसे न देता दुकानदाराची तब्बल आठ लाखांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले असून, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.

साताऱ्यात दुकानदाराची आठ लाखांची फसवणूक
सातारा : महागडे साहित्य खरेदी करून त्याचे पैसे न देता दुकानदाराची तब्बल आठ लाखांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले असून, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
अमीत चव्हाण असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, नितीन विश्वनाथ अनपट (रा. तामजाईनगर, सातारा) यांचे साताऱ्यात इलेक्ट्रॉनिक दुकान आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांच्या दुकानातून अमीत चव्हाण याने फ्रीज, वॉशींग मशीन, एलईडी अशा प्रकारचे विविध प्रकारचे ८ लाख २ हजार रुपयांचे साहित्य खरेदी केले. मात्र, त्याचे पैसे दिले नाहीत. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अनपट यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.