शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

साताऱ्यात राष्ट्रवादीला दे धक्का, आमदार शशिकांत शिंदेंचा 1 मताने पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 09:13 IST

जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये जावली विकास सेवा सोसायटी मतदार संघात तणावपूर्ण वातावरण असतानाच रविवारी मतदानात दिवशीच आमदार शशिकांत शिंदे आणि त्यांचे विरोधी ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झाली होती.

ठळक मुद्दे राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांचा 1 मताने धक्कादायक पराभव झाला आहे. या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी विजय मिळवला. 

मुंबई - सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सोसायटी मतदारसंघासाठी  सातारा येथे शांततेत मतदान पार पडले. या मतदान प्रक्रियेत ४१६ पैकी ३९७ मतदारांनी सहभाग नोंदवला. या मतदानाची टक्केवारी ९५.४३ टक्के इतकी असून या मतांची मोजणी आज मंगळवार सकाळी (ता. २३) साताऱ्यात होत आहे. सकाळी हाती आलेल्या निकालानुसार राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे यांचा 1 मताने धक्कादायक पराभव झाला आहे. या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी विजय मिळवला. ज्ञानदेव रांजणे यांनी जावळीतून ही निवडणूक लढवली आहे.  

जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये जावली विकास सेवा सोसायटी मतदार संघात तणावपूर्ण वातावरण असतानाच रविवारी मतदानात दिवशीच आमदार शशिकांत शिंदे आणि त्यांचे विरोधी ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झाली होती. यावेळी पोलिसांच्या उपस्थितीतच एकमेकांना अपशब्द वापरणे पर्यंत मजल गेली होती. मोठा अनर्थ व्हायच्या आधीच आमदार शिंदे आणि रांजणे यांनी मध्यस्थी करून समजुतदारपणा दाखवला आणि वाद मिटवला.

जिल्हा बँकेच्या जावळी मतदारसंघासाठी एकूण 49 मतदारांनी आपला हक्क बजावला होता. त्यापैकी शशिकांत शिंदे यांना 24 मतं मिळाली असून 25 मतं घेत रांजणेंनी विजय मिळवला आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतील 21 जागांसाठी ही निवडणूक होत असून 10 जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरीत 11 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून पहिला निकाला हाती आला. त्यामध्ये, आमदार शशिकांत शिंदेंचा पराभव झाला आहे. 

१0 संचालक बिनविरोध

या निवडणुकीच्‍या केंद्रस्‍थानी असणाऱ्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंच्‍या भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. पक्षविरहित बँकेची वाटचाल यापुढेही कायम तशीच राहावी, यासाठी राष्‍ट्रवादीचे अध्‍यक्ष शरद पवार यांनी चर्चा, परस्‍पर सामंजस्‍याने निवडणूक टाळण्‍याच्‍या सूचना केल्‍या होत्‍या. या सूचनांमुळे निवडणूक बिनविरोध होण्‍याच्‍या हालचाली गतिमान झाल्‍या होत्‍या. पहिल्‍याच टप्‍प्‍यात आमदार शिवेंद्रसिंहराजें‍सह १० संचालक बिनविरोध निवडून आले. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरbankबँकElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसShashikant Shindeशशिकांत शिंदे