शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-बंगळुरू महामार्गावर भुईंजजवळ शिवशाही बस पेटली; अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 16:22 IST

प्रवाशांनी खचाखच भरलेली होती बस

सातारा : पुणे-बंगळुरू महामार्गावर वाई (ता. भुईंज) येथे कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या शिवशाही बसला अचानक आग लागली. यानंतर काही मिनिटांतच बस या आगीत जळून खाक झाली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. ही घटना रविवारी सकाळी घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोल्हापूरहून पुण्याला शिवशाही बस (एमएच ०६ बीडब्ल्यू ३५२३) निघाली होती. ही बस प्रवाशांनी खचाखच भरलेली होती. वाई तालुक्यातील भुईंज येथील बदेवाडी गावाजवळ आल्यानंतर बसच्या डाव्या बाजूच्या चाकाजवळ आग लागल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. यानंतर तातडीने बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. पाहता-पाहता बसने पेट घेतला. संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या आगीत बसचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.यावेळी भुईंज कारखान्याचे अग्निशामक दल तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत बस जळून खाक झाली होती. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप समोर आलेले नाही. भुईंज पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.