शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे स्वगृही परतण्याची चर्चा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 12:44 AM2019-12-06T00:44:42+5:302019-12-06T00:45:21+5:30

तरीदेखील ते मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले. तर जयकुमार गोरे यांचे सर्वच विरोधक एकत्र आले होते. तसेच त्यांचे बंधू शेखर गोरे हे शिवसेनेच्या माध्यमातून त्यांच्याविरोधात उभे होते, तरीदेखील माणच्या जनतेने जयकुमार गोरे यांच्या बाजूने कौल दिला.

 Shivinder Singh Sinha Bhosale, Jayakumar Gore talk about returning home! | शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे स्वगृही परतण्याची चर्चा !

शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे स्वगृही परतण्याची चर्चा !

googlenewsNext
ठळक मुद्देनवे वळण : भाजप पुन्हा सरकार स्थापन करेल, असा गोरेंचा विश्वास

सातारा : भाजपची सत्ता पुन्हा येईल, या भरवशावर स्वपक्षाला रामराम ठोकून भाजपसोबत गेलेले राज्यातील आमदार पुन्हा स्वगृही परतणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. साताऱ्यातील शिवेंद्रसिंहराजे भोसले हे कमळ सोडून पुन्हा घड्याळ हाती बांधणार का? तसेच जयकुमार गोरे पुन्हा हातात ‘हात’ देणार? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता ताणली गेली आहे.

शिवेंद्रसिंहराजे भोसले हे अनेक वर्षांपासून सातारामतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. तसेच जयकुमार गोरे यांनीही माण मतदारसंघावर मांड ठेवली. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजे राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेले. तरीदेखील ते मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले. तर जयकुमार गोरे यांचे सर्वच विरोधक एकत्र आले होते. तसेच त्यांचे बंधू शेखर गोरे हे शिवसेनेच्या माध्यमातून त्यांच्याविरोधात उभे होते, तरीदेखील माणच्या जनतेने जयकुमार गोरे यांच्या बाजूने कौल दिला.

भाजपच्या सरकारमध्ये साता-याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे आणि जयकुमार गोरे यांना मंत्रिपद मिळेल, असे भाजपचे वरिष्ठ नेते स्पष्टपणे सांगत होते. मात्र भाजप सरकारच स्थापन करू शकणार नाही, हेही आता स्पष्ट झाले आहे. विकासकामांसाठी सत्तेसोबत असणे गरजेचे आहे, असे सांगतच दोन्ही आमदार भाजपमध्ये सामील झाले होते. आता राज्यातील इतर काही आमदारांप्रमाणेच हे दोघेही स्वगृही परतण्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

आमदार जयकुमार गोरे यांनी या चर्चेबाबत स्पष्टीकरण केले. आपण भाजपसोबतच राहणार असून, भाजपचेच सरकार पुन्हा सत्तेत येईल, असा दावाही त्यांनी केला. तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भूमिका मात्र गुलदस्त्यात राहिली आहे.

मी कुणाच्याही संपर्कात नाही, तसेच माझ्याही इतर कोणत्याही पक्षाशी किंवा नेत्याशी संपर्क झाला नाही. इतर कोणी संपर्कात नाही. मी सध्या बाहेरगावी आहे.
-शिवेंद्रसिंहाराजे भोसले , सातारा


मी आहे त्या ठिकाणी आनंदात आहे. मला कुठल्याही पक्षात जाण्याची गरज नाही. राज्यातील जनतेने भाजप-शिवसेना युतीला बहुमत दिले होते; परंतु शिवसेनेच्या भूमिकेमुळे ही परिस्थिती निर्माण झाली. - जयकुमार गोरे, माण

Web Title:  Shivinder Singh Sinha Bhosale, Jayakumar Gore talk about returning home!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.