शिवेंद्रसिंहराजे धावले एकवीस किलोमीटर
By Admin | Updated: December 16, 2014 00:11 IST2014-12-15T22:28:49+5:302014-12-16T00:11:45+5:30
महाराष्ट्रातील एकमेव ‘धावपटू आमदार’ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले.

शिवेंद्रसिंहराजे धावले एकवीस किलोमीटर
सातारा : दरवर्षी वेगवेगळ्या मॅरेथॉनमध्ये आपला उत्स्फूर्त सहभाग दाखविणाऱ्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गोव्यातही तब्बल २१ किलोमीटर चालून महाराष्ट्रातील एकमेव ‘धावपटू आमदार’ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले.
वास्को येथील ‘गोवा रिव्हर’ या मॅरेथॉन उपक्रमात रविवारी सातारा जिल्ह्यातील २५ ते ३० नागरिकांनी भाग घेतला होता.
सातारचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही याठिकाणी तब्बल २१ किलोमीटर चालून मॅरेथॉनवरचे आपले प्रेम सिद्ध केले. गोव्यातील या मॅरेथॉनमध्ये भाग घेणारे एकमेव आमदार म्हणून शिवेंद्रसिंहराजेंचा मोठ्या कौतुकाने उल्लेख केला गेला. स्पर्धेत अनेक सातारकर सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)