शिवेंद्रसिंहराजे जिल्हा न्यायालयात हजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 10:42 IST2021-03-17T10:41:06+5:302021-03-17T10:42:03+5:30

Shivendrasinghraja Bhosale Court Satara-भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले हे जिल्हा न्यायालयात हजर झाले. चार वर्षांपूर्वी कोजागिरी पौर्णिमे दिवशी गाजलेल्या सुरुचि राडा प्रकरणात जामीन नियमित राहण्याठी ते आपल्या सहकार्‍यांसोबत आले होते. सुमारे अर्ध्या तासानंतर न्यायालयीन प्रक्रिया झाल्यानंतर ते न्यायालयातून बाहेर पडले.

Shivendra Singh Raje appears in the District Court | शिवेंद्रसिंहराजे जिल्हा न्यायालयात हजर

शिवेंद्रसिंहराजे जिल्हा न्यायालयात हजर

ठळक मुद्देशिवेंद्रसिंहराजे जिल्हा न्यायालयात हजरखटल्याचे कामकाज आता सेशन कोर्टात

सातारा: भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले हे जिल्हा न्यायालयात हजर झाले. चार वर्षांपूर्वी कोजागिरी पौर्णिमे दिवशी गाजलेल्या सुरुचि राडा प्रकरणात जामीन नियमित राहण्याठी ते आपल्या सहकार्‍यांसोबत आले होते. सुमारे अर्ध्या तासानंतर न्यायालयीन प्रक्रिया झाल्यानंतर ते न्यायालयातून बाहेर पडले.

आनेवाडी टोलनाक्याच्या वादातून खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले एकमेकांसमोर उभे राहिले होते. याच वादातून दोन्ही राजेंसह त्यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते.

या खटल्याचे कामकाज आता सेशन कोर्टात चालणार आहे. यामुळे पहिले जामीन नियमित करण्याची प्रक्रिया होती. त्यानुसार आमदार शिवेंद्रराजे व त्यांचे समर्थक जिल्हा न्यायालयात हजर झाले.

Web Title: Shivendra Singh Raje appears in the District Court