शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे पाय सत्तेच्या ‘फेव्हिकॉल’मध्ये अडकलेत - शरद पवार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 13:21 IST

शिवसेनेचे पाय सत्तेच्या फेव्हिकॉलमध्ये अडकलेत,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

क-हाड : 'मी पन्नास वर्षे सार्वजनिक व राजकीय जीवनात काम करतोय; पण सत्तेत राहायचं आणि मित्रपक्षाच्या विरोधातच आंदोलने करत बोलायचं, असं मी यापूर्वी कधीही पाहिलेलं नाही. शिवसेनेला सत्तेचा मोह सोडवत नाही, असं मी यापूर्वीही बोललो होतो. त्यामुळे ‘ध’ चा ‘मा’ करण्याचा प्रश्नच नाही. शिवसेनेचे पाय सत्तेच्या फेव्हिकॉलमध्ये अडकलेत,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. क-हाड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

शरद पवार म्हणाले, ‘शेतक-यांच्या कर्जमाफीवर सरकारने आडमुठी भूमिका घेतली तर आम्ही सत्तेवर लाथ मारू, असे विधान यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते; पण काय करणार ते आमच्या मित्राचे चिरंजीव आहेत. त्यामुळे जास्त काय बोलणार? शेतक-यांच्या कर्जमाफीला छत्रपती शिवरायांचे नाव देऊन शेतक-यांचाच नव्हे तर शिवरायांचाही यांनी अवमान केला आहे. सत्तेत येतानाही या मंडळींनी छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव वापरले. मात्र, शिवरायांचे स्वराज्य कुठे आणि यांचे सरकार कुठे, हे जनतेला कळू लागले आहे.’ 

‘दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी पाहिलेले उज्ज्वल महाराष्ट्राचे स्वप्न यापूर्वीच्या राज्यकर्त्यांना पूर्ण करता आले नाही. ते स्वप्न आमचे सरकार पूर्ण करीत आहे,’ असे विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिवादनावेळी केल्याचे समजल्यानंतर पवार यांनी त्याचाही समाचार घेतला. पवार म्हणाले, ‘हा तर या वर्षातील सर्वात मोठा विनोद आहे. मुख्यमंत्री ज्या विचारधारेत वाढले आणि काम करीत आहेत, त्या विचारधारेचा यशवंतराव चव्हाणांना कधी स्पर्शही झाला नाही, ही त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे.’ 

‘१५ लाख ४२ हजार शेतक-यांच्या खात्यावर ६ हजार १५ कोटी कर्जमाफीची रक्कम जमा केल्याचे मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी सांगितले आहे. त्याबद्दल विचारले असता, यापूर्वीही दोनदा मुख्यमंत्र्यांनी असेच विधान केले होते. मात्र, कर्जमाफीचा फायदा शेतक-यांना झालेला नाही. त्यांचे विधान म्हणजे ‘बोलाची कडी आणि बोलाचाच भात,’ असल्याची टीकाही पवार यांनी केली.

''ममता बॅनर्जींना लवकरच भेटणार''ममता बॅनर्जी यांनी नुकतीच मुंबईत भेट घेतली. ती कशासाठी, असे विचारले असता, भेट त्या दोघांची झाली. त्यामुळे ती कशासाठी झाली आणि भेटीवेळी काय चर्चा झाली, हे मला माहीत नाही. मात्र येत्या आठवड्यात ममता बॅनर्जींना मी भेटणार असून, त्यावेळी याची माहिती घेईन, असे त्यांनी सांगितले. 

''रस्त्यावर महिन्यात खड्डे पडतात!''सुप्रिया सुळेंच्या ‘खड्डे वुईथ सेल्फी’वर सत्ताधा-यांकडून टीकेची झोड उठत आहे. या खड्ड्यांना राष्ट्रवादीच जबाबदार असल्याचे ते सांगतात. याबाबत छेडले असता पवार म्हणाले, ‘रस्ते दुरुस्तीचे काम हे खरंतर अव्याहतपणे सुरू असतं. आम्ही सत्तेवर असतानाही ते सुरूच राहायचं. आत्ताही कदाचित ते सुरू असेल. मात्र, कामाला गुणवत्ता नसल्यामुळे महिन्यात रस्त्यावर खड्डे पडतात, ही बाब गंभीर आहे.’  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेस