शिवसंग्रामचा १७ जानेवारीला मुंबईत महामेळावा
By Admin | Updated: January 15, 2015 23:33 IST2015-01-15T21:28:59+5:302015-01-15T23:33:53+5:30
आता नव्या सरकारने तरी हा प्रश्न निकाली काढावा अशी आशा आहे़

शिवसंग्रामचा १७ जानेवारीला मुंबईत महामेळावा
कऱ्हाड : मराठा आरक्षणाबाबत वेळोवेळी आपली परखड बाजू मांंडणाऱ्या तसेच शेतकऱ्यांच्या ऊसदर, पीककर्जाबाबत सरकारला वस्तुस्थिती पटवून देणाऱ्या शिवसंग्राम संघटनेचा १७ जानेवारीला वर्धापन दिन होत आहे़ त्यानिमित्ताने मुंबईत महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अजित बानगुडे व शिवसंग्राम महाराष्ट्रराज्य प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली़ बानगुडे म्हणाले, मराठा आरक्षणाविषयी शिवसंग्राम संघटनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर आवाज उठवण्यात आला होता़ शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी शासनाला वेळोवेळी आंदोलने, उपोषणाच्या माध्यमातून आरक्षण प्रश्नावर निर्णय घेण्यास भाग पाडले होते़ जुन्या सरकारने मध्यंतरी मराठा आरक्षणाबाबत जो आवाज उठवला, त्यावेळी त्यांच्या निर्णयाचे शिवसंग्रामनेही स्वागत केले होते़ आता नव्या सरकारने तरी हा प्रश्न निकाली काढावा अशी आशा आहे़ मुंबई येथे वर्धापनदिननिमित्त होणाऱ्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले़ यावेळी शिवाजी चव्हाण, दादासाहेब थोरात, आदींसह शिवसंग्राम संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते़ (प्रतिनिधी)