शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
2
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
3
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
4
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
5
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
6
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
7
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
8
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
9
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
10
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
11
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
12
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
13
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
14
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
15
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
16
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
17
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
18
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
19
मकर राशीसाठी नवीन वर्ष 2026: जुन्या आव्हानांचा होणार अंत; प्रगतीसाठी 'हे' सूत्र वापरा आणि यश मिळवा!
20
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
Daily Top 2Weekly Top 5

Satara Crime: हनीट्रॅपचा झाला पर्दाफाश; अपहरणकर्त्या तथाकथित पत्रकार, मनसे तालुकाध्यक्षासह तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 15:22 IST

चॅटिंग करून महिला बोलत असल्याचे भासवले. त्यानंतर भेटायला बोलावले

शिरवळ (जि. सातारा) : फलटण तालुक्यातील एका ३५ वर्षीय तरुणाला हनीट्रॅपच्या जाळ्यात ओढणाऱ्या तथाकथित पत्रकार, तडीपार युवक व मनसे खंडाळा तालुकाध्यक्षासह तिघांना शिरवळ पोलिसांनी नुकतीच अटक केली असून न्यायालयाने १२ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.तथाकथित पत्रकार किरण प्रकाश मोरे (मूळ, रा. कर्नावड, ता. भोर, पुणे, सध्या रा. शिरवळ, ता. खंडाळा), सातारा जिल्ह्यातून तडीपार असलेला विशाल महादेव जाधव, महाराष्ट्र नवनिर्माण सेना खंडाळा तालुकाध्यक्ष इरफान दिलावर शेख (दोघेही रा. शिरवळ, ता. खंडाळा) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. या तिघांना दि. १२ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.फलटण तालुक्यातील ३५ वर्षीय युवकाला २० ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर चॅटिंग करून महिला बोलत असल्याचे भासवले. त्यानंतर त्याला वीर धरण परिसरात भेटायला बोलावले. संबंधित युवक कारने त्या ठिकाणी भेटायला गेला. त्यावेळी तेथे वरील तिघे होते. संशयितांनी त्या तरुणाला त्याच्याच कारमध्ये बसवले. त्याचे अपहरण करून त्याला फायबर काठीने, हाताने, तोंडावर पाठीवर जबर मारहाण केली.

घडलेल्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितले तर ॲट्राॅसिटी व विनयभंग, अत्याचाराचा गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकण्याची भीती घातली. तसेच खंडणीस्वरूपात कार नावावर करून देण्यास सांगितले. या प्रकारानंतर संबंधित तरुणाला त्यांनी सोडून दिले.तो जखमी झाल्यामुळे रुग्णालयात उपचार घेत होता. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याने हनीट्रॅपमध्ये आरोपींनी नेमके कसे अडकवले, याची तक्रार पोलिसांकडे दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून तिघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

‘ती’ महिला कोण?फलटण तालुक्यातील तरुणाला दूरध्वनीद्वारे हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकविणारी ती महिला कोण? हे पुढे येणे गरजेचे असून, याचा शोध घेण्याचे आव्हान शिरवळ पोलिसांसमोर आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara Crime: Honeytrap busted; Journalist, MNS leader, accomplice arrested.

Web Summary : Satara: Three arrested for honey-trapping a young man, including a journalist and MNS leader. They lured him, assaulted him, and demanded extortion money, threatening false charges. Police are searching for the woman involved.