शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिरवळ-लोणंद रस्ता : संपादित जमिनीच्या जाहीर निवाड्यात अनेकांची नावेच गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 18:08 IST

शिरवळ-लोणंद रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी भूसंपादित शेतकऱ्यांना मोबदला अद्याप मिळालेला नाही. न्यायालयाने याबाबत दिलेल्या सूचनांची दखल घेत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, प्रशासनाने संपादित जमिनीच्या जाहीर केलेल्या निवाड्यात अनेक खातेदारांची नावेच नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देशिरवळ-लोणंद रस्ता : मोबदला अद्याप नाहीअंमलबजावणीत झालेल्या विलंबानंतर महसूल प्रशासनाने संबंधित शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या

खंडाळा : शिरवळ-लोणंद रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी भूसंपादित शेतकऱ्यांना मोबदला अद्याप मिळालेला नाही. न्यायालयाने याबाबत दिलेल्या सूचनांची दखल घेत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, प्रशासनाने संपादित जमिनीच्या जाहीर केलेल्या निवाड्यात अनेक खातेदारांची नावेच नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी संपादित केलेल्या जमिनीला २०१३ च्या नवीन भूसंपादन कायद्यानुसार मोबदला देण्याचा न्यायालयाचा निर्णय झाला आहे. याबाबत अंमलबजावणीत झालेल्या विलंबानंतर महसूल प्रशासनाने संबंधित शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत.

वास्तविक संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीच्या क्षेत्रात ज्या खातेदारांची नावे सातबाऱ्यावर आहेत. त्यातील अनेकांची नावे जाहीर केलेल्या निवाड्यात आलेली नाहीत. त्यामुळे शेतकरी संभ्रमित झालेले आहेत. खातेदारांची नावेच नसल्याने भरपाई नक्की कोणाला मिळणार, असा प्रश्न उपस्थित झाला असल्याचे शेतकरी कृती समितीने स्पष्ट केले आहे.शिरवळ-बारामती रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम दहा वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले होते. यासाठी लागणाऱ्या जमिनीची भसंपादन प्रक्रिया राबविण्यात आली. या रस्त्याचे शिरवळपासून भादेपर्यंत बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. मात्र भादे, वाठार, शेडगेवाडी, अंदोरी, मरीआईचीवाडी या गावांच्या हद्दीतील काम गेली अनेक वर्षे ठप्प आहे. या ठिकाणी संपादित क्षेत्राला योग्य भाव मिळाला पाहिजे. यासाठी काही शेतकऱ्यांनी शेतकरी बचाव कृती समितीच्या माध्यमातून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.वास्तविक, २०१३ च्या नवीन सुधारित भूसंपादन कायद्यानुसार संपादित क्षेत्राचा रेडिरेकनर दराप्रमाणे शेतकऱ्यांना मोबदला द्यावा. तसेच विलंबानुसार व्याजासह रक्कम अदा करावी, असा आदेश न्यायालयाने भूसंपादन विभागाला दिला आहे. त्यानुसार १२/२ च्या नोटिसा दिल्या असल्यातरी प्रत्यक्षात नावांचा घोळ कायम आहे. प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे शेतकरी मात्र त्रस्त झाले आहेत.

रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी संपादित होणाऱ्या जमिनीला योग्य मोबदला मिळावा, यासाठी कृती समितीने लढा देऊन न्याय मिळविला. यामध्ये विकासकामाला अडचण करण्याची शेतकऱ्यांची कोणतीही भूमिका नव्हती. मात्र, प्रशासन शेतकऱ्यांना अडचण निर्माण करीत आहे. निवाड्यात प्रकल्पग्रस्त सर्वांची नावे समाविष्ट करून तातडीने शेतकऱ्यांना मोबदला द्यावा, हीच अपेक्षा आहे .- कुंडलिक दगडे,शेतकरी कृती समिती

टॅग्स :highwayमहामार्गSatara areaसातारा परिसर