अनमोल पाणपोई जपण्यासाठी शिरवळकर काढणार लोकवर्गणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 23:10 IST2018-01-12T23:10:00+5:302018-01-12T23:10:22+5:30

अनमोल पाणपोई जपण्यासाठी शिरवळकर काढणार लोकवर्गणी
शिरवळ : शिरवळ येथील चौपाळा याठिकाणी असणाºया ऐतिहासिक पाणपोईचे जतन करण्याकरिता शिरवळकर नागरिक सरसावले आहे. दरम्यान, ऐतिहासिक असणाºया पाणपोईचे जतन करण्यासाठी पुरातन विभागाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी शिरवळकर नागरिकांमधून होत आहे.
चौपाळा याठिकाणी दहाव्या शतकातील ऐतिहासिक पाणपोई आहे. महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामामुळे दगडी पाणपोईचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पाणपोईचे जतन करण्याकरिता लोकवर्गणीतूनही करण्याकरिता सरसावले आहे. याबाबत युवकवर्गातून ‘लोकमत’ने राबविलेल्या पाणपोई वाचवा मोहिमेचे उत्स्फूर्तपणे कौतुक करीत आहेत.