जावली तालुका सुंदर गाव स्पर्धेत शिंदेवाडी प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:28 IST2021-05-29T04:28:24+5:302021-05-29T04:28:24+5:30

कुडाळ : निसर्गसौंदर्याने नटलेल्या पाचगणीच्या पायथ्याशी वसलेल्या शिंदेवाडीला जावळी तालुक्यातून ‘आर. आर. आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार’ जाहीर ...

Shindewadi first in Jawali taluka beautiful village competition | जावली तालुका सुंदर गाव स्पर्धेत शिंदेवाडी प्रथम

जावली तालुका सुंदर गाव स्पर्धेत शिंदेवाडी प्रथम

कुडाळ : निसर्गसौंदर्याने नटलेल्या पाचगणीच्या पायथ्याशी वसलेल्या शिंदेवाडीला जावळी तालुक्यातून ‘आर. आर. आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. या स्पर्धेत जावली तालुक्यातील चोरंबे व शिंदेवाडी या दोन ग्रामपंचायतींमध्ये चुरस होती. सुरुवातीला चोरांबेला हा पुरस्कार जाहीर झाला होता. मात्र, फेरतपासणी होऊन २०१९-२०करिता तालुक्यातून सुंदर गाव म्हणून शिंदेवाडीची निवड करण्यात आली आहे.

याबाबतचा निकाल नुकताच जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी जाहीर केला. सन २०१९-२० करिता ‘आर. आर. आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार’ योजनेंतर्गत जावळी तालुक्यातील ग्रामपंचायतींची तपासणी गटविकास अधिकारी, वाई यांच्यामार्फत करण्यात आली होती. यानुसार ८ फेब्रुवारी २०२१ रोजी गुणांकन करून यादी जिल्हा परिषदेकडे सुपूर्द करण्यात आली होती. त्यामध्ये तालुक्यातील चोरंबे गावाला ८९ गुण तर शिंदेवाडीला ८६ गुण दिले होते.

मात्र, शासन निर्णयातील तरतुदीनुसार शिंदेवाडीच्या सरपंचांनी याला हरकत घेऊन हे गुणांकन मान्य नसल्याबाबत तक्रार केली होती. त्यानुसार चोरंबे व शिंदेवाडी या दोन्ही ग्रामपंचायतींची पुरस्काराच्या निकषानुसार ९ मार्च २०२१ रोजी फेरतपासणी करण्यात आली. यामध्ये गुणांकनानुसार शिंदेवाडीची ‘आर. आर. आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार’साठी निवड करण्यात आली.

कोट :

शिंदेवाडी ग्रामस्थांनी सुंदर गाव होण्यासाठी खूप परिश्रम घेतले. ग्रामस्थांच्या चिकाटीमुळे आणि केलेल्या प्रामाणिक कष्टांमुळे आम्हाला यशाची आशा होती. मात्र, आकस्मिकपणे आम्ही स्पर्धेतून बाहेर पडलो, तरीही आम्ही धीर सोडला नाही. त्यासाठी पाठपुरावा केला, त्यामुळेच आम्ही आज सुंदर गाव योजनेचा प्रथम क्रमांक पटकावला आहे.

- धनश्री शिंदे, सरपंच, शिंदेवाडी

फोटो : जावली तालुका सुंदर गाव स्पर्धेत शिंदेवाडीला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला.

===Photopath===

280521\polish_20210528_101909484.jpg

===Caption===

जावली तालुका सुंदर गाव स्पर्धेत शिंदेवाडीला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला.

Web Title: Shindewadi first in Jawali taluka beautiful village competition