शेखर गोरेंच्या ताकदीबद्दल सांशकता
By Admin | Updated: August 22, 2014 22:29 IST2014-08-22T22:10:05+5:302014-08-22T22:29:35+5:30
महायुतीच्या उमेदवारीसाठी धडपड : ‘प्रतापसिंह’ होण्याच्या भीतीपोटी नेत्यांकडून चालढकल

शेखर गोरेंच्या ताकदीबद्दल सांशकता
सातारा : विधानसभेसाठी शड्डू ठोकल्यानंतर माण पंचायत समिती सदस्य शेखर गोरे यांनी भाजप अथवा महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या कोणत्याही पक्षात प्रवेश मिळावा म्हणून गेल्या काही दिवसांत मुंबई आणि दिल्ली वाऱ्या वाढविल्या आहेत. मात्र, त्यांना भाजप, शिवसेनेने वेटिंगवरच ठेवले असून, त्यांच्या राजकीय ताकदीबद्दलच सांशकता व्यक्त केली आहे. परिणामी त्यांच्या अस्वस्थतेने ‘शिखर’ गाठले आहे.
जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ असून, यापैकी सर्वाधिक लक्षवेधी लढत माण विधानसभा मतदारसंघात होणार असल्याचे सध्या तरी चित्र आहे. दरम्यान, शेखर गोरे यांनी महायुतीच्या उमेदवारीसाठी धडपड सुरू केली असली तरी त्यांचा ‘प्रतापसिंह’ झाल्यास पुढे काय, अशीही भीती अनेकांच्या मनात आहे. त्यामुळेच त्यांच्या उमेदवारीच्या निर्णयाबाबत चालढकल सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात रंगली आहे. (प्रतिनिधी)