महिलांचे तिखट शब्द... अन् पुरुषांची वाकडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 12:47 AM2020-01-28T00:47:53+5:302020-01-28T00:51:24+5:30

आपल्यावरील अत्याचाराविषयी बोलताना म्हणाली, ‘आम्ही शरीराने पुरुष असलो तरीही मनाने महिला आहे, असं कोणाला सांगितलं की पहिल्यांदा आम्हाला चिडवलं जातं. त्यानंतर जवळच्या नातेवाइकांकडूनच आमच्यावर शारीरिक अत्याचार केला जातो. याविषयी कुठंही आवाज उठविला तर आम्हालाच गप्प बसवतात. विशेष म्हणजे आम्हाला यासाठी परावृत्त करण्यासाठी कुटुंबीयांकडूनच मोठ्या प्रमाणावर भावनिक अत्याचार केला जातो.’

 The sharp words of women ... and the curly eyes of men | महिलांचे तिखट शब्द... अन् पुरुषांची वाकडी नजर

महिलांचे तिखट शब्द... अन् पुरुषांची वाकडी नजर

Next
ठळक मुद्देतृतीयपंथीयांची खंत : निसर्गानं जसं जन्माला घातलं तसंच स्वीकारण्याची आर्त हाकअस्वस्थ जाणिवा

प्रगती जाधव-पाटील ।
सातारा : महिला खूप कोमल मनाच्या असल्या तरीही त्यांचे शब्द टोकाचे तिखट आणि मानसिक खच्चीकरण करणारे असतात. एकही वाकडा शब्द न बोलणाऱ्या पुरुषांची आमच्या अंगावर खेळणारी नजर त्रासदायक असते. निसर्गानं जसं आम्हाला जन्माला घातलं तसंच आम्हाला स्वीकारा, इतकी माफक अपेक्षा तृतीयपंथी व्यक्त करत आहेत.

समाजात वावरताना तृतीयपंथी म्हणून हेटाळणी, व्यक्तिगत पातळीवर होणारी चेष्टा आणि खासगीत होणारे अत्याचार याविषयी तक्रार करण्यासाठी त्यांना कायद्यातही अद्याप ठोस मार्ग नाही. तृतीयपंथीयांवर होणाºया शारीरिक आणि मानसिक छळवणुकीसाठी स्वतंत्र कायदा अस्तित्वात नसल्यामुळे त्यांची अनेक पातळ्यांवर कोंडी होत आहे.
तृतीय पंथीयांना कायदेशीर मान्यता मिळाल्यानंतरही समाजात त्यांच्याविषयीची स्वीकृती भावना आढळून येत नाही. तृतीयपंथी म्हटलं की भडक मेकअप, मोठ्या आवाजात टाळी वाजवणारे आणि दहशत माजवून पैसे वसूल करणारे अशी त्यांची प्रतिमा समाजात आहे. सरसकट तृतीयपंथी असे नाहीत; पण एखाद्याचं असं वर्तन त्यांच्याविषयी समाजाची नजर बदलायला पूरक ठरते.

आपल्यावरील अत्याचाराविषयी बोलताना म्हणाली, ‘आम्ही शरीराने पुरुष असलो तरीही मनाने महिला आहे, असं कोणाला सांगितलं की पहिल्यांदा आम्हाला चिडवलं जातं. त्यानंतर जवळच्या नातेवाइकांकडूनच आमच्यावर शारीरिक अत्याचार केला जातो. याविषयी कुठंही आवाज उठविला तर आम्हालाच गप्प बसवतात. विशेष म्हणजे आम्हाला यासाठी परावृत्त करण्यासाठी कुटुंबीयांकडूनच मोठ्या प्रमाणावर भावनिक अत्याचार केला जातो.’

 

  • शाळेत नपुसकलिंगही शिकवा...!

शालेय अभ्यासक्रमात स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुसकलिंग अशी तीन लिंग शिकवली जातात. पाठ्यक्रम जसा पुढं जाईल तसं स्त्रीलिंग आणि पुल्लिंग राहतं, नपुसकलिंग अगदीच दुर्लक्षित होतं. शालेय अभ्यासक्रमात असलेल्या नपुसकलिंगाची शिकवण बालवयातच दिली गेली तर समाजात आमची होणारी हेटाळणी टळू शकते, असे मत सुधा पाटील यांनी व्यक्त केले.

 

  • कुटुंबाकडून तीव्र विरोध

दोन किंवा तीन मुलींनंतर पालकांच्या पोटी मुलगा म्हणून जन्माला आल्यानंतर म्हातारपणाची काठी म्हणून त्यांना वाढविण्यात येते. वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत मुलांबरोबर वावरल्यानंतर आपल्यात महिला सुलभ भावना असल्याचे समजल्यानंतर याविषयी मोकळेपणाने बोलण्याची व्यवस्था समाजरचनेत नाही. कुटुंबात याविषयी चर्चा केली तर तीव्र विरोध आणि मानसिक छळ करण्यात येते. पालकांच्या अपेक्षा आणि व्यक्ती स्वांतत्र्य या दुुहेरी कचाट्यात अडकल्याने आयुष्य संपविण्याचाही विचार मनात येतो.

 

मला नर्सिंगचे शिक्षण घ्यायचे आहे. हे शिक्षण फक्त स्त्रियांना दिले जाते, असे संस्थेचे म्हणणे आहे. मी शरीराने पुरुष असलो तरी मनाने बाई आहे; पण माझ्या बाई असण्याचा शारीरिक पुरावा देण्यासाठी मी असमर्थ आहे.
- आर्या पुजारी, सातारा


 

Web Title:  The sharp words of women ... and the curly eyes of men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.