शर्मिष्ठा शिंदे सौंदर्यस्पर्धेत प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:25 IST2021-06-23T04:25:18+5:302021-06-23T04:25:18+5:30
फलटण : फलटण तालुक्यातील शिंदेवाडीचे सुपुत्र राम शिंदे यांची कन्या डॉ. शर्मिष्ठा शिंदे हिने ‘मिस लेगसी युनिव्हर्स २०२०’ ही ...

शर्मिष्ठा शिंदे सौंदर्यस्पर्धेत प्रथम
फलटण : फलटण तालुक्यातील शिंदेवाडीचे सुपुत्र राम शिंदे यांची कन्या डॉ. शर्मिष्ठा शिंदे हिने ‘मिस लेगसी युनिव्हर्स २०२०’ ही जागतिक सौंदर्य स्पर्धा जिंकली आहे. शर्मिष्ठाने भारताचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत घानाची सौंदर्यवती रिसिया बासोह दुसरी व इंडोनिशियाची साब्रीना आयुल ही तिसरी आली.
हैदराबादमध्ये शर्मिष्ठाने कँपस प्रिन्सेस फायनलिस्ट २०२० ही सौंदर्य स्पर्धासुद्धा जिंकली आहे. मिस इंडिया या संस्थेने या स्पर्धेचे आयोजन फेब्रुवारी २०२० मध्ये केले होते. स्पर्धेच्या परीक्षक श्रेया राव होत्या.
शर्मिष्ठा कथक आणि बेली डान्समध्ये पारंगत असून प्रसिद्ध मॉडेल आहे. देश परदेशातील जाहिरातींमध्ये ती भाग घेते. शर्मिष्ठाने दंतवैद्याचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. ती उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जाणार आहे.
यशाबद्दल खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्या अॅड. जिजामाला नाईक-निंबाळकर यांनी कौतुक केले.