सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे रयत शिक्षण संस्थेतील कार्यक्रमाच्या निमित्ताने गुरुवारी (दि. ८) सातारा मुक्कामी आल्याने शासकीय विश्रामगृहात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाण मांडल्याचे दिसून आले. याचवेळी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर यांनी तर पवार यांचे स्वागतही केले. त्यामुळे राजकीय चर्चांना चांगला ऊत आला आहे.रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शुक्रवारी होणाऱ्या पुण्यतिथी कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार हे गुरुवारी सायंकाळी विश्रामगृहात दाखल झाले. यावेळी त्यांच्याबरोबर खासदार नीलेश लंके हेही होते. याचवेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर हेही उपस्थित होते. त्यांनी पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर ते लगेच निघून गेले.
साताऱ्यात अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांनी शरद पवार यांचे स्वागत केले, चर्चेला उधाण आले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 11:53 IST