Lok sabha 2024: शरद पवार साताऱ्यात दाखल, जाणून घेताहेत कार्यकर्त्यांची मते
By दीपक शिंदे | Updated: March 29, 2024 11:53 IST2024-03-29T11:51:53+5:302024-03-29T11:53:30+5:30
उदयनराजेंकडून स्वत:च्या उमेदवारीची घोषणा, मात्र तिसऱ्या यादीतही नाव नाही

Lok sabha 2024: शरद पवार साताऱ्यात दाखल, जाणून घेताहेत कार्यकर्त्यांची मते
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार आज, शुक्रवारी सातारा दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सातारा मतदार संघातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. महामार्गावरील एका हॉटेलमध्ये ही प्रक्रिया सुरू असून दुपारी दोन वाजता शरद पवार पत्रकार परिषद घेणार आहेत.
महाविकास आघाडी तसेच महायुतीतूनही सातारा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार ठरलेला नाही. महायुतीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात मतदारसंघ मिळविण्यावरुन रस्सीखेच सुरू आहे. यावर अजून तोडगा निघालेला नाही. तर आघाडीत राष्ट्रवादीचा शरद पवार गट निवडणूक लढविणार आहे. या गटाचाही उमेदवार अजून निश्चित नाही.
उदयनराजेंकडून स्वत:च्या उमेदवारीची घोषणा
दिल्लीत ठाण मांडून बसलेल्या उदयनराजेंचे साताऱ्यात आगमन होताच मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी उदयनराजेंनी स्वत:च्या उमेदवारीची घोषणा करत उमेदवार यादी जाहीर होईल. तो एक प्रक्रियेचा भाग आहे. पण सगळं निश्चित झालं आहे. मी निवडणूक लढणारच आहे," असा दावा केला होता. भाजपची तिसरी यादी जाहिर झाली तरी यात देखील उदयनराजेंचे नाव दिसले नाही. त्यामुळे, उदयनराजे अद्यापही वेटिंगवरच आहेत.