श्रावण सोहळ्यात ‘सखीं’चा आनंद द्विगुणित...

By Admin | Updated: August 28, 2014 22:21 IST2014-08-28T21:38:04+5:302014-08-28T22:21:52+5:30

उत्स्फूर्त प्रतिसाद : मेहंदी, रांगोळी, केशरचना स्पर्धेसह विविध कार्यक्रम

Shakhan celebrates the joy of 'Sakhi' ... | श्रावण सोहळ्यात ‘सखीं’चा आनंद द्विगुणित...

श्रावण सोहळ्यात ‘सखीं’चा आनंद द्विगुणित...

सातारा : श्रावण महिन्यात मंगळागौरीचे खेळ आणि सणावारांना उधाण येतं. मग हातावर नक्षी रेखाटायची असो, किंवा दारात रांगोळीचा सडा घालायचा असो. सखीच्या उत्साहाला सीमाच राहत नाही. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत सखी मंच’ने आयोजित केलेल्या श्रावण सोहळा कार्यक्रमाने सखींचा आनंद द्विगुणीत केला. मेहंदी, रांगोळी, केशरचना स्पर्धेसह विविध कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
येथील गोडोलीतील धनलक्ष्मी मंगल कार्यालयात ‘लोकमत सखी मंच’च्या वतीने या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन ‘लोकमत’चे संस्थापक दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलानाने हेम एजन्सीजचे हेमंत शहा यांनी केले. यावेळी टीव्हीएस कंपनीचे टीपीएल अरुण रूपनर, हेम टीव्हीएसचे मॅनेंजर राजेंद्र राजे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व हेम टीव्हीएस मोटर्स यांनी स्वीकारले होते.
या कार्यक्रमात स्कूटीच्या डिझाईनमध्ये रंग भरण्याची स्पर्धा घेण्यात आली. सखींनी आपल्या कल्पकतेने त्यामध्ये हिरवा, पांढरा, निळा, पिवळा, लाल असे रंग भरले. या स्पर्धेलाही सखींना प्रतिसाद दिला. फुगे फुगवून फोडण्याचीही स्पर्धा झाली. यामुळे सखींची चांगलीच करमणूक झाली. या स्पर्धेलाही सखींनी दाद दिली. पंजाबी, चुडीदार ड्रेस परिधान केलेल्या सखींंसाठी म्युझिक डान्सची स्पर्धा झाली. शेवटपर्यंत डान्स करणाऱ्या सखींना बक्षिसे देण्यात आली. त्याचबरोबर दोरी उडी ही स्पर्धाही झाली.
बकेटमध्ये बॉल टाकणे स्पर्धेला सखींचा प्रतिसाद मिळाला. बॉल बकेटमध्ये टाकताना सखींना कसरत करावी लागत होती. काही बॉल बकेटमध्ये पडत तर काही बाजूला जात. यामुळे खेळणाऱ्या सखींबरोबरच उपस्थित सखींतूनही हास्य निर्माण होत होते.
या सर्व स्पर्धांचे परीक्षण इम्प्रेशन ब्युटी पार्लरच्या संचालिका व प्रसिद्ध सौंदर्यतज्ज्ञ स्वाती ओक यांनी केले.
या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Shakhan celebrates the joy of 'Sakhi' ...