शहरं
Join us  
Trending Stories
1
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
2
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
3
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
4
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
5
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
6
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
7
आजपासून नेमके काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? पीएफच्या नियमांत मोठे बदल!
8
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
9
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
10
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
11
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
12
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
13
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
14
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
15
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
16
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
17
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
18
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
19
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
20
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

Satara Politics: माढा लोकसभेसाठी साताऱ्यातील पावणे सात लाख मतदार

By नितीन काळेल | Updated: January 24, 2024 17:55 IST

सातारा : लोकसभा निवडणुकीला थाेडाच अवधी राहिला असून जिल्हाधिकारी कार्यालय पातळीवर निवडणुकीची तयारी होत आहे. या पार्श्वभूमीवर मतदारसंघाची अंतिम ...

सातारा : लोकसभा निवडणुकीला थाेडाच अवधी राहिला असून जिल्हाधिकारी कार्यालय पातळीवर निवडणुकीची तयारी होत आहे. या पार्श्वभूमीवर मतदारसंघाची अंतिम मतदारयादी जाहीर झाली असून माढा लोकसभेसाठी १९ लाख ६६ हजार मतदार आपला हक्क बजावणार आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील ६ लाख ७८ हजार मतदारांचा समावेश आहे.लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर २००९ ला माढा अस्तित्वात आला. या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा, सांगोला आणि माळशिररस या चार विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. तर सातारा जिल्ह्यातील माण आणि फलटण हे दोन विधानसभा मतदारसंघही माढा लोकसभेला जोडलेले आहेत. त्यामुळे मतदारसंघात सोलापूर जिल्ह्याचे अधिक मतदार असतात. लोकसभा निवडणूक एप्रिल महिन्यात होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच शासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. तसेच राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाने मतदारांची अंतिम मतदार यादीही जाहीर केली आहे. त्यानुसार कोणत्या विधानसभा मतदारसंघात अधिक मतदार असणार हेही समोर आलेले आहे. सातारा आणि सोलापूर जिल्ह्यानेही मतदारयादी प्रसिद्ध केली आहे. सातारा जिल्ह्यात एकूण २५ लाख ४६ हजार मतदार आहेत. यामध्ये माण आणि फलटण विधानसभा मतदारसंघातील मतदारांचाही समावेश आहे. पण, माण आणि फलटणमधील मतदार हे लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत.

एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे निवडणुकीत कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार यावरही विधानसभा मतदारसंघातून कसा मतदाराचा प्रतिसाद राहील हेही समोर येणार आहे. तसेच उमेदवारांना निवडणुकीला सामोरे जाताना राजकीय आखाडेही बांधता येणार आहेत. तरीही माढा लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील मतदारांचा वरचष्मा अधिक राहणार, हे निश्चित आहे. त्याचबरोबर माढा लोकसभेसाठी विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास माणमध्ये सर्वाधिक मतदारांची नोंद झालेली आहे.

माढा लोकसभेसाठी मतदार असे..विधानसभा मतदारसंघ मतदारमाढा ३,३२,९७१करमाळा ३,१४,७१८सांगोला ३,०६,६६५माळशिरस ३,३३,६१८माण ३,४५,१४३फलटण ३,३२,८८६

तीनवेळा तीन जिल्ह्यातील खासदार..माढा लोकसभा मतदारसंघ सोलापूर आणि सातारा जिल्ह्यात विस्तारला आहे. या मतदारसंघाचे पहिल्यांदा २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नेतृत्व केले होते. त्यांनी भाजपचे उमेदवार सुभाष देशमुख यांचा पराभव केला होता. पवार हे पुणे जिल्ह्यातील उमेदवार होते. २०१४ च्या दुसऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीचेच व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी युतीचे सदाभाऊ खोत यांच्यावर विजय मिळविलेला. मोहिते-पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. तर २०१९ च्या तिसऱ्या निवडणुकीत भाजपने प्रथमच कमळ फुलविले. सातारा जिल्ह्यातील फलटणच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांना पराभूत केले होते. तीन निवडणुकीत तीन जिल्ह्यातील उमेदवारांनी विजय मिळविला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरlok sabhaलोकसभाVotingमतदानSolapurसोलापूर