शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

अपहरण करण्यासाठी वापरलेली गाडी जप्त करायची असल्याने सात दिवस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 7:07 PM

सातारा : पंचवीस लाखांच्या खंडणीसाठी तेजस विजय जाधव (वय १७, रा. आष्टे, पुनर्वसित, ता. सातारा) या युवकाचा खून केल्याप्रकरणी ...

ठळक मुद्दे खूनप्रकरणातील संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी खूनाची कबुली

सातारा : पंचवीस लाखांच्या खंडणीसाठी तेजस विजय जाधव (वय १७, रा. आष्टे, पुनर्वसित, ता. सातारा) या युवकाचा खून केल्याप्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी तिघांना अटक केली होती. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता दि. २८ पर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.आशिष बन्सी साळुंखे (वय २९), साहिल रुस्तम शिकलगार (वय २५, दोघेही रा. नागठाणे, ता. सातारा), शुभम उर्फ सोन्या संभाजी जाधव (वय ३०, रा. मोळाचा ओढा परिसर, सातारा) अशी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, तेजस जाधव याचा २५ लाखांच्या खंडणीसाठी या तिघांनी खून केल्याचे शुक्रवारी उघडकीस आले होते. बोरगाव पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने या तिघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी खूनाची कबुली दिली होती. त्यानंतर तेजसचा मृतदेह विहीरीतून बाहेर काढण्यात आला होता. पोलिसांनी त्यांना शनिवारी दुपारी जिल्हा न्यायालयात हजर केले. संशयितांनी खून करताना अजून कोणाची मदत घेतली आहे का, अपहरण करण्यासाठी वापरलेली गाडी जप्त करायची असल्याने त्यांना पोलीस कोठडी मिळावी, असा युक्तिवाद सरकारी वकीलांनी केला. त्यावर न्यायालयाने संशयितांना सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी हे करत आहेत. 

टॅग्स :Courtन्यायालयSatara areaसातारा परिसर