मलकापूरला शिवसेनेच्या दहा पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

By Admin | Updated: July 12, 2015 21:14 IST2015-07-12T21:14:46+5:302015-07-12T21:14:46+5:30

निवडीवरून नाराजी : अन्याय केल्याचा आरोप

Sena's ten office bearers resign in Malkapur | मलकापूरला शिवसेनेच्या दहा पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

मलकापूरला शिवसेनेच्या दहा पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

कऱ्हाड : मलकापूर शहरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड प्रक्रिया पार पडली. निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर मलकापूरचे माजी शहरप्र्रमुख तानाजी देशमुख यांच्या जागी मधुकर शेलार यांची निवड करण्यात आली आहे. देशमुख यांच्यावर अन्याय झाल्याचे सांगत मलकापूर येथील दहा पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहे.
पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, मलकापूर शहरात तानाजी देशमुख यांनी अनेक सामाजिक प्रश्नांना शिवसेनेच्या माध्यमातून वाचा फोडली आहे. सलग बारा वर्षे त्यांनी केलेल्या कामांमुळे सामान्य लोकांचे प्रश्न मार्गी लागले आहेत. देशमुख यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ दहा पदाधिकारी राजीनामे देत आहेत.
राजीनामे दिलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये विभागप्रमुख राजेंद्र शिंगण, उपविभागप्रमुख मनोज ऐतवडेकर, उपशहरप्रमुख संजय भागवत, सुंदर खंडागळे, विभागप्रमुख बिपीन भागवत, उपविभाग प्रमुख उल्हास कोळी, विभागप्रमुख विनय तिवारी, उपविभागप्रमुख सागर महाजन, दीपक तुपे, शहर प्रसिद्धी प्रमुख मंगेश सुरवसे यांचा समावेश आहे. याबाबत मलकापूर विभागप्रमुख राजेंद्र शिंगण यांनी पत्रक दिले असून त्यावर राजीनामा दिलेल्यांच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Sena's ten office bearers resign in Malkapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.