शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

विद्यार्थ्यांसाठी स्वत: विकत घेतला लॅपटॉप--बालाजी जाधव : हजारो तंत्रस्नेही शिक्षक घडविण्याबरोबरच गुगल सन्मानित शिक्षकाचा मिळाला मान-शिक्षक दिनविशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 21:21 IST

शेळ्या-मेंढ्याच्या मागं भाकरीचा चंद्र शोधणाऱ्या आई-बापांशिवाय उजाड माळरानावर भटकणाºया मुलांची परिस्थिती संवेदनशील शिक्षकाची घालमेल करणारी ठरली. या मुलांसाठी काहीतरी करण्याचं ‘लातूर पॅटर्न’च्या बालाजी जाधव

-प्रगती जाधव-पाटीलसातारा : शेळ्या-मेंढ्याच्या मागं भाकरीचा चंद्र शोधणाऱ्या आई-बापांशिवाय उजाड माळरानावर भटकणाºया मुलांची परिस्थिती संवेदनशील शिक्षकाची घालमेल करणारी ठरली. या मुलांसाठी काहीतरी करण्याचं ‘लातूर पॅटर्न’च्या बालाजी जाधव या गुणी शिक्षकानं ठरवलं आणि ज्या वर्गांमध्ये केवळ उभा एक असंच शिकवलं जायचं तिथं चक्क चित्र बोलती झाली. पदरमोड करून विद्यार्थ्यांना स्वत:चा लॅपटॉप हाताळायला देणाºया जाधव यांच्या कामाची धडपड लक्षात घेऊन त्यांना जगप्रसिद्ध गुगलनेही सन्मानित केले.

लातूर येथील आणि नोकरीच्या निमित्ताने सातारा जिल्'ात आलेले बालाजी जाधव आता पक्के सातारकर झाले आहेत. माण तालुक्यातील शिंदेवाडी या शाळेतून त्यांनी ज्ञानदानाचे काम सुरू केले. भर उन्हात उद्देशहीन फिरणाºया मुलांना शाळेत आणलं तर त्यांची करमणूकही झाली पाहिजे, त्यामुळे विद्यार्थ्यांना आवडतील अशी चित्रं आणि गाणी दाखवणं गरजेचं असल्याचं त्यांना वाटलं. ज्या शाळेत वीज नाही तिथं संगणक तर फारच लांबची गोष्ट! मग लॅपटॉपचा मार्ग खुला झाला आणि १२ विद्यार्थ्यांनी सुरू झालेला वर्ग चक्क दुप्पट झाला!

गरिबांच्या मुलांना शिक्षणाच्या वाटेवर नेताना त्यांची गुणवत्ता सुधरविण्यासाठी त्यांनी मुलांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसवलं. पहिल्या वर्षी अपेक्षित निकाल लागला नाही. शिक्षण देताना नेमकी काय गडबड होतेय, हे लक्षात आल्यानंतर चित्र आणि गाण्यांच्या रुपाने त्यांनी हजारो प्रश्नोत्तरांची बँकच तयार केली. त्यातून २००८ मध्ये काही विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले. शिक्षणाचं नेमकं तंत्र समजल्यानंतर जिल्'ात सर्वत्रच या प्रश्नोत्तरांच्या बँकचा वापर झाला. त्यातून शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होणाºयांची संख्या वाढत गेली.

शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राहता यावं म्हणून व्हिडीओ, आॅनलाईन टेस्ट, आॅफलाईन अ‍ॅप्स, अ‍ॅनिमेटेड फ्लिपबुक आदी शैक्षणिक साधनांची निर्मिती करून त्यांनी शिकणं सोपं करून ठेवलं.राज्यभरातील १०० पेक्षा जास्त कार्यशाळा घेऊन राज्यातील हजारो शिक्षकांना टेक्नासॅव्ही बनविण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे. ५०० हून अधिक मोफत आॅनलाईन स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रमही त्यांनी डिझाईन केला आहे. एका क्लिकवर १५ देशाच्या सफरी त्यांनी विद्यार्थ्यांना घडवल्या आहेत. सुमारे २५ अँड्रॉईड अ‍ॅप करण्याचं श्रेयही त्यांना जातं. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांनी सुरू ठेवलेलं काम सर्वांसाठी मार्गदर्शक असंच आहे.सबकुछ विद्यार्थ्यांच्या दृष्टीनेच४ विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊन बालाजी जाधव यांनी वर्गातील भिंतीवर क्यूआर कोड फ्लॅश केला आहे. टॅबच्या सा'ाने मुलं यामुळे खूप सोप्या पद्धतीने अवघड विषयांची सफर करून येतात.४ जगभरातील ७० पेक्षा अधिक देशांशी शैक्षणिक संपर्क असल्यामुळे अ‍ॅनिमेशन, कराटे, चित्रकला आदी बाबी व्हर्च्युअल कॉन्फरन्सद्वारे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध४ शिक्षणासाठी उपक्रमशील काम करणाºयांकडून लोकसहभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपयुक्त वस्तू पुरविण्याची धडपड अद्यापही सुरू आहे.

 

ग्रामीण भागात सुविधांचा अभाव असताना जागतिक दर्जाचे शिक्षण तंत्रज्ञानातील व्हर्च्युअल कॉन्फरन्सने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. आॅफलाईन अ‍ॅनिमेटेड फ्लिपबुक हा प्रयोग राष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त ठरला. मराठी माध्यमातून शिकून मराठी माध्यमातील जिल्हा परिषद शाळेसाठी काम करतोय, याचा सार्थ अभिमान वाटतो.- बालाजी जाधव, शिक्षक, पुळकोटी, ता. माण, जि. सातारा 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTeacherशिक्षकlaptopलॅपटॉपdigitalडिजिटल