नवनाथ ढमाळ यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:48 IST2021-06-09T04:48:13+5:302021-06-09T04:48:13+5:30

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील असवली गावचे सुपुत्र नवनाथ ढमाळ यांची ८ ते १३ जून या कालावधीत पोलंड ...

Selection of Navnath Dhamal | नवनाथ ढमाळ यांची निवड

नवनाथ ढमाळ यांची निवड

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील असवली गावचे सुपुत्र नवनाथ ढमाळ यांची ८ ते १३ जून या कालावधीत पोलंड येथील वारसा येथे खेळविण्यात येणाऱ्या जागतिक क्रमवारी कुस्ती स्पर्धेसाठी तांत्रिक अधिकारी पदी निवड करण्यात आली आहे.

नवनाथ ढमाळ हे जागतिक कुस्ती संघटनेचे अधिकृत पंच आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पंच म्हणून कामगिरी केलेली आहे. पोलंड येथे ८ जूनपासून होणाऱ्या जागतिक स्पर्धेसाठी ते तांत्रिक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

या निवडीबद्दल महाराष्ट्र कुस्तिगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्ष नामदेव मोहिते, सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, संपत साळुंखे, बंकट यादव, ललित लांडगे, दिनेश गुंड, दिलीप पवार व असवली ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.

Web Title: Selection of Navnath Dhamal