शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

भारतातील दुसरी नाईट मॅरेथॉन साताऱ्यात - स्पर्धकांचा रात्रीचा सराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 8:51 PM

संपूर्ण भारतात खऱ्या अर्थाने नाईट मॅरेथॉन ही एकमेव बेंगलोरला होते, त्यानंतर भारतात अशी ही दुसरी आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमच अशी नाईट मॅरेथॉन २ जून रोजी साताऱ्यात होणार

सातारा : संपूर्ण भारतात खऱ्या अर्थाने नाईट मॅरेथॉन ही एकमेव बेंगलोरला होते, त्यानंतर भारतात अशी ही दुसरी आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमच अशी नाईट मॅरेथॉन २ जून रोजी साताऱ्यात होणार आहे, गेले दोन वर्षे साताºयात फारसा गाजावाजा न करता सातत्याने दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी होणारी एक मोफत एन्ट्री असलेली तीन, पाच, दहा किलोमीटरची मॅरेथॉन आपल्याला कदाचित माहीत असेल, इलसोमच्या टीमने साताऱ्यात पहिली फूल मॅरेथॉन घ्यायचे ठरवले, तशी गेले नऊ महिने तयारी केली.सकाळी वेळ न मिळाल्यास रात्रीदेखील पळू शकता, व्यायाम करू शकता हा संदेश देणारी, दैनंदिन ट्रॅफिकला त्रास होणार नाही, याची काळजी घेऊन रात्रीचे नियोजन करण्यात आले. तसेच साताºयात प्रथमच फूल डिस्टन्स म्हणजेच ४२.१९ किलोमीटर अंतरची मॅरेथॉन करायचे ठरवले.

१ जानेवारी रोजी या मॅरेथॉनची आॅनलाईन नावनोंदणी प्रक्रिया सुरू झाली आणि ३१ जानेवारीला संपली देखील. संपूर्ण भारतातून, बेंगलोर, दिल्ली, दार्जिलिंग, नागपूर, जालना, सोलापूर, चेन्नई अशा वेगवेगळ्या शहरांतून सिरिअस रनर्सनी या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला असून, साताऱ्यातील १६६ आणि बाहेरून ५५६ अशा एकूण ७२२ रनर्सनी भाग घेतला आहे. ३१ जानेवारीनंतर किमान ५०० रनर्सना रजिस्ट्रेशन नाकारावे लागले, कारण नाईट मॅरेथॉनचे पहिले एडिशन, फूल मॅरेथॉनचे मोठे डिस्टन्स आणि बाहेरून येणाºया इतक्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायची ही महत्त्वपूर्ण जबाबदारी या टीमने प्रथमच पेलायची आहे. त्यामुळे आता पुढच्या १ जानेवारीला नावनोंदणी करा’ असे खूपजणांना सांगावे लागले.२ जून रोजी रात्री अकरा ते पहाटे पाच या वेळेमध्ये रनर्सना प्रोत्साहन द्यायला सातारकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन एएफएसएफ प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

असा असेल मॅरेथॉनचा मार्गही नाईट मॅरेथॉन, रात्री अकरा वाजता शाहू स्टेडियम येथून सुरू होऊन राधिका रोड, गोलमारुती मंदिर, समर्थ मंदिर, अदालतवाडा रोड, नगरपालिका चौक, कमानी हौद, मोती चौक, ५०१ पाटी, पोलीस हेडक्वार्टर, गीते बिल्डिंग, चुना भट्टी रोड, पोवई नाका, मोनार्क हॉटेल, कलेक्टर आॅफिस, झेडपी चौक, विसावा नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट आणि परत स्टेडिअम अशी असणार आहे.