फुकटच्या ॲपमुळे शाळांची डोकेदुखी;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:43 IST2021-08-25T04:43:12+5:302021-08-25T04:43:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : ऑनलाईन शिक्षणाचे धडे गिरविण्याची विद्यार्थ्यांना सवय लागत असतानाच, फुकटच्या ॲपने शाळांची डोकेदुखी वाढवली आहे. ...

फुकटच्या ॲपमुळे शाळांची डोकेदुखी;
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ऑनलाईन शिक्षणाचे धडे गिरविण्याची विद्यार्थ्यांना सवय लागत असतानाच, फुकटच्या ॲपने शाळांची डोकेदुखी वाढवली आहे. या ॲपला आवश्यक संरक्षण नसल्याने भर वर्गात डर्टी पिक्चर दिसल्याने पालक आणि शिक्षकांचा ताण वाढला आहे. हे पिक्चर पाहून विद्यार्थ्यांच्या मनात आलेल्या प्रश्नांना उत्तरे देता देता पालकांची मात्र भंबेरी उडाली.
मार्च २०२० मध्ये कोविड दाखल झाल्यानंतर शाळा ऑनलाईन सुरू आहेत. बऱ्याचदा ऑनलाईन वर्ग सुरू असताना, चुकीचे प्रकार घडत असल्याने डोक्यावर हात मारून घ्यायची वेळ येत आहे. ऑनलाईन वर्ग सुरू असताना इंटरनेट आवश्यक असते आणि कुठल्याही शैक्षणिक लिंकवर गेले असता, नको त्या जाहिरातींच्या लिंक, तसेच नको त्या अश्लील लिंक, चित्र, व्हिडिओ समोर येतात. विद्यार्थीही कुतूहलापोटी व उत्सुकतेपाटी लिंकला खोलतात. कधी अनावधानाने, तर कधी मुद्दाम विद्यार्थी व्हिडिओ ग्रुपवर पाठवला जातो. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांना व शिक्षकांनाही त्याचा त्रास होतो. पालकांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
शाळांनी ही घ्यावी काळजी
ऑनलाईन क्लाससाठी वापरात येणारे सॉफ्टवेअर हे कोणतेही असेल तरी चालते. मात्र, त्यातील जर पेड व्हर्जन घेतले, तर त्यात अधिक चांगली सुरक्षा मिळते.
एखादा शिक्षक जर ऑनलाईन वर्ग घेत असेल, तर त्या शिक्षकाला वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची ओळख असायला हवी. ऑनलाईन वर्गात खोड काढणाऱ्या विद्यार्थ्यांबाबतीत सतर्क असण्याची गरज आहे. शिक्षकांनी पाठविलेली लिंक विद्यार्थ्यांनी इतरांना पाठवू नये, अशी समज विद्यार्थ्यांना देण्यात यावी.
क्लासमध्ये सरसकट प्रवेश देऊ नये. आधी वेटिंग रूम तयार करावी, जी ओळखीची नावे आहेत, त्यांनाच प्रवेश द्यावा.
काही पेड सॉफ्टवेअरमध्ये आधी प्रत्येक व्यक्तीकडून फॉर्म भरून घेतला जातो आणि मगच लिंक सेंड होते. त्यामुळे मिटिंगमध्ये किंवा क्लासमध्ये कोण आले होते, त्याची यादी मिळते.
शक्य असल्यास मिटिंगला पासवर्ड द्या
पालकांनीही दक्ष राहण्याची गरज
हातात असलेला स्मार्टफोन वापरण्याची माहिती पालकांना असणे आवश्यक आहे. विद्यार्थी काय शिकतात, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मुले चोरून लपून काही करत असतील, तर त्यांच्यावर कटाक्ष ठेवणे पालकांचे कर्तव्य आहे. मुलांचे चुकीच्या गोष्टीबाबत समुपदेशन करणे गरजेचे आहे. शक्यतो ऑनलाईन वर्गानंतर मुलांकडे मोबाईल देऊच नये.
बऱ्याचदा पालक त्यांच्या कामात असताना मुलांना ऑनलाईन क्लास जॉईन करून देतात आणि नंतर पालक त्यांची कामे करतात. अशावेळीही मुले मोबाईलमधील क्लास सोडून गेम खेळणे, मित्रांबरोबर चॅटिंग करण्याचे प्रकार करतात
जोड आहे