शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

सातारा जिल्ह्यातील आंबेघर भोगवली सोसायटीत ८४ लाखांचा घोटाळा, कर्ज वसुलीचे पैसे केले हडप  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 13:18 IST

सभासदांच्या येणे-देणे व्यवहाराच्या पासबुकवर खोट्या नोंदी केल्या

सातारा : जावळी तालुक्यातील आंबेघर भोगवली विकास सेवा सोसायटीमध्ये तब्बल ८४ लाख ३९ हजार २७९ रुपयांचा घोटाळा झाला असून, याप्रकरणी सोसायटीच्या सचिवावर मेढा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अजित तुकाराम रांजणे (वय ४१, रा. दापवडे, ता. जावळी, जि. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या सचिवाचे नाव आहे.याबाबत मेढा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आंबेघर (ता. जावळी) येथील आंबेघर भोगवली विकास सेवा सोसायटीमध्ये अजित रांजणे हा सचिव म्हणून काम करत आहे. लेखा परीक्षक गणेश भीमराव पोफळे (४१, रा. वालूथ, ता. जावळी, जि. सातारा) यांनी २०२१-२०२२ या वर्षाचे या सोसायटीचे लेखा परीक्षण केले. त्यावेळी सोसायटीच्या सचिवाने तब्बल ८४ लाखांचा घोटाळा केला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सचिव अजित रांजणे याने पदाचा गैरवापर करून सभासदांच्या नावावर परस्पर कर्ज उचलले. तसेच कर्जदारांची दिशाभूल करून चलनाद्वारे कर्जदारांचे पैसे काढून घेतले. काही सभासदांकडून कर्जाच्या वसुलीचे पैसे घेऊन बँकेत न भरता स्वत: हडप केले. एवढेच नव्हे तर कर्जदारांना बँकेची नसलेली वसुलीची चलने दिली. तसेच त्यांना कर्ज असताना कर्ज नसल्याचा खोटा दाखला दिला. सभासदांच्या येणे-देणे व्यवहाराच्या पासबुकवर खोट्या नोंदी केल्या. अशा विविध प्रकारे कर्जदारांची ८४ लाख ३९ हजार २७९ रुपयांची फसवणूक केली.याबाबत लेखा परीक्षक गणेश पोफळे यांनी मेढा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी सचिव अजित रांजणे याच्यावर गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिस