शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

सातारची मंत्रिपदाची पाटी कोरी !

By admin | Updated: December 5, 2014 23:19 IST

चार दशकांची परंपरा खंडित : शंभूराज देसाई यांच्या रुपाने होती एकमेव आशा

सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये शुक्रवारी नव्याने वीस मंत्र्यांचा शपथविधी झाला. यावेळीही सातारा जिल्ह्यातून पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांचा समावेश होईल, अशी चर्चा राजकीय वर्तूळात होती. मात्र, सातारची पाटी मंत्रीपदाच्या रस्सीखेचीत कोरीच राहिली आहे. सातारा जिल्ह्याला मंत्रिपद मिळाले नसल्यामुळे मंत्रिपदाची गेल्या चार दशकाची परंपरा आता खंडित झाली आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या वाट्याची दोन मंत्रीपदे अजून बाकी असून या विस्तारात तरी सातारचा समावेश होईल की नाही, याविषयी सांशकताच आहे.
महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर राज्याच्या सूत्रे अनेकदा सातारा जिल्ह्याच्या हातीच राहिली आहेत. विशेष म्हणजे मालोजीराजे नाईक-निंबाळकर यांनी मुंबई प्रांतात मंत्री म्हणून काम केले आहे. यशवंतराव चव्हाण, बॅ. बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सांभाळले आहे. विलासराव पाटील-उंडाळकर, अभयसिंहराजे भोसले, यशवंतराव मोहिते, बाळासाहेब देसाई, मदनराव पिसाळ, रामराजे नाईक-निंबाळकर, श्याम अष्टेकर, शशिकांत शिंदे यांनी मंत्री म्हणून काम पाहिले आहे. गेली चार दशकाहून अधिक काळ सातारच्या वाट्याला नेहमीच लाल दिवा मिळाला आहे. मात्र, मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या विस्तारात ही पंरपरा आता खंडित झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळात मराठवाडा आणि विदर्भाला प्राधान्य देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्हा वगळता सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात भाजपबरोबरच शिवसेनेही चांगले यश मिळविले आहे. कोल्हापूरात तर शिवसेनेने काँग्रेसचा सफाया केला. त्यामुळे या विस्तारात कोल्हापूरला शिवसेनेकडून मंत्रिपदाची संधी दिली जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, तीही फोल ठरली. सांगली जिल्ह्यालाकडेही भाजप आणि शिवसेनेने दुर्लक्ष केले आहे.
जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ असून पाच मतदारसंघ राष्ट्रवादीकडे तर दोन काँग्रेस आणि एक शिवसेनेकडे आहे. जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार शंभूराज देसाई असून ते पाटणमधून विजयी झाले आहेत. शंभूराज यांना राज्यमंत्रीपद निश्चित झाल्याचे मानल्याची चर्चा रंगल्याने पाटण मतदारसंघातील शेकडो कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले होते.
मात्र, त्यांचीही घोर निराशा झाली आहे. भाजपचा घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नावाची गेले अनेक दिवस चर्चा सुरू होती.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मंत्रिपदाचा शब्द दिल्याचा दावाही जानकर यांनी प्रसारमाध्यमांसमोर केला होता. मात्र, त्यांचेही मंत्री होण्याचे स्वप्न अधूरे राहिले आहे. (प्रतिनिधी)


पालकमंत्री कोण..?
नवीन मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सातारचे पालकमंत्री कोण..? हा विषय आता पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. महादेव जानकर यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल आणि सातारचे पालकमंत्रीही तेच राहतील, अशी राजकीय चर्चा सुरू होती. मात्र, त्यांचे नावच नसल्यामुळे ही चर्चा आतातरी धुसर झाली आहे. दरम्यान, गिरीश बापट यांचा समावेश झाल्यामुळे ते आता पुण्यावर दावा करणार, याविषयी कोणतेही दुमत नाही. दिवाकर रावते हे कॅबिनेट मंत्री तर विजय शिवतारे राज्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यापैकी एकाचे नाव निश्चित होऊ शकते, असेही मानले जात आहे. रावते यांनी पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळल्यामुळे आणि त्यांनी साताऱ्यात बऱ्यापैकी सेनेची पायाभरणी केल्यामुळे त्यांचा नावाचा विचार होऊ शकतो, असे सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांना वाटते.