‘आॅनर किलिंग’चा साताऱ्यात निषेध

By Admin | Updated: December 19, 2015 01:08 IST2015-12-19T01:00:20+5:302015-12-19T01:08:02+5:30

सहआरोपींचा शोध घ्या : महिला लोक आयोग संघटनेची मागणी

Saturn's prohibition of 'Aaner Killing' | ‘आॅनर किलिंग’चा साताऱ्यात निषेध

‘आॅनर किलिंग’चा साताऱ्यात निषेध

सातारा : कोल्हापूर येथे घडलेल्या ‘आॅनर किलिंग’च्या निषेधार्थ सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी ‘राज्य महिला लोक आयोग’ या संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्या भावांनी आणि त्याच्या मित्राने हा खून केला, त्यांना पाच तासांत पोलिसांनी अटक केली ही चांगली गोष्ट आहे. परंतु, या दोघांना सख्ख्या बहिणीचा खून करायला लावणारे आणि जातीसाठी भयंकर कृत्य करायला उद्युक्त केले. त्या सर्वांचा पोलिसांनी शोध घेऊन भारतीय दंड संहितेनुसार कट करून खून केल्याप्रकरणी सहआरोपी करून ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. राज्य शासनाने ‘आॅनर किलिंग’संदर्भातील विधेयकाचे कायद्यात रूपांतर करावे.
तरुण मुला-मुलींना बदललेल्या मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये जाती-धर्मापलीकडे जाऊन आपला जोडीदार निवडण्याचा, त्याच्याशी लग्न करून सुखी होण्याचा अधिकार राज्यघटनेने दिला आहे. तरीही पुरुषसत्ताक व्यवस्थेची तरुण पिढी बळी जात आहे. हे आपण शांतपणे बघू शकत नाही. काही स्त्रियांदेखील संघर्ष नको म्हणून कुटुंबाअंतर्गत शांत राहून त्या जीवघेणी तडजोड करतात. त्याही या जात व्यवस्थेचा बळी जात आहेत.
निवेदनावर अध्यक्षा अ‍ॅड. वर्षा देशपांडे, राज्य सचिव अ‍ॅड. शैला जाधव, जिल्हाध्यक्षा माया पवार, बसंती दायमा, वनिता शेळके, कविता बनसोडे, प्रेरणा भिलारे यांच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Saturn's prohibition of 'Aaner Killing'