शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीच्या पेचात साताऱ्याच्या जागा

By admin | Updated: September 17, 2014 22:23 IST

तिढा कसा सुटणार : मुंबईच्या निर्णयाकडे स्थानिक कार्यकर्त्यांच्या नजरा

सातारा : शिवसेना-भाजपच्या जागावाटपात ७८ जागांचा जो पेच निर्माण झाला आहे, त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. कऱ्हाड उत्तर, वाई, कोरेगाव आणि सातारा विधानसभा मतदारसंघ कोणाला द्यायचे, याची चर्चा अजूनही काही केल्या संपायला तयार नाही.भाजपच्या वाट्याला गतविधानसभा निवडणुकीत कऱ्हाड दक्षिण, सातारा आणि माण हे तीन विधानसभा मतदारसंघ होते. मात्र, लोकसभा निवडणुकीतील यशानंतर भाजपने जिल्ह्यातील आणखी दोन मतदारसंघ मागितले आहेत. यामध्ये कोरेगाव आणि वाई या दोन मतदारसंघांचा समावेश आहे. जागांची अदलाबदल झाली तर फलटण आणि माण वगळता जिल्ह्यातील महायुतीचे चित्र कसे राहणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याच्या नजरा आहेत. माजी आमदार मदन भोसले जर भाजपच्या चिन्हावर लढण्यास तयार असतील, तर ‘वाई’ भाजपला सोडला जाणार आहे. परिणामी येथून शिवसेनेत आलेल्या डी. एम. बावळेकर यांची मोठी गोची होणार आहे. कोरेगावातून शिवसेनेचे हणमंत चवरे, दिनेश बर्गे यांची नावे चर्चेत असली तरी भाजपने या मतदारसंघावर दावा केला आहे. /पान ३ वरजागा सेनेकडे आणि उमेदवार स्वाभिमानीचा‘कऱ्हाड दक्षिण’ अथवा ‘कऱ्हाड उत्तर’ यापैकी एक जागा शिवसंग्रामला देण्याची मागणी अध्यक्ष विनायक मेटे यांची आहे. मात्र, या जागेवर सेनेचा प्रबळ दावा आहे. येथून स्वाभिमानीने शड्डू ठोकला आहे. शिवसंग्रामला जागा मिळणार नसल्याचे संकेत आहेत आणि सेनाही जागा सोडायला तयार नाही. त्यामुळे ‘कऱ्हाड उत्तर’ जरी सेनेला गेली, तरी स्वाभिमानी सांगेल तो उमेदवार असेल, अशी माहिती महायुतीतील घटक पक्षाच्या एका नेत्याने दिली.